सुप्रिया पाठक बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. खिचडी ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकांबरोबर त्यांनी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुप्रिया पाठक यांनी १९८८ साली शाहीद कपूरचे वडील अभिनेते पंकज कूपर यांच्याशी लग्न केलं. शाहीद कपूर सुप्रिया यांचा सावत्र मुलगा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहीद कपूरबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- ‘जब वी मेट २’ कधी प्रदर्शित होणार? इम्तियाज अली यांनी सोडलं मौन; चित्रपटाच्या सिक्वेलबाबत माहिती देत म्हणाले…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

१९८४ साली पंकज कपूर यांनी त्यांची पहिली पत्नी निलिमा यांच्याबरोबर घटस्फोट घेतला. शाहीद निलिमा आणि पंकज कपूर यांचा मुलगा आहे. नुकतंच एका मुलाखतीत शाहीद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठक यांनी शाहीद आणि त्यांच्या नात्याच्या बॉन्डवर भाष्य केलं आहे.

सुप्रिया म्हणाल्या, “शाहीद माझा मुलगा आहे आणि त्याच्या दोन्ही मुलांबरोबर माझं चांगलं नात आहे. आम्ही सगळेच एकमेकांबरोबरचं नातं घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कुटुंबाला प्राधान्य देतो आणि सुख दु:ख एकमेकांबरोबर वाटून घेतो. जेव्हा मी शाहीदला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो सहा वर्षांचा होता. तो खूप गोड मुलगा होता. माझ्यासाठी तो जगातला सगळ्यात गुणी मुलगा आहे. त्याचीही मला भेटून वेगळी भावना नव्हती. त्यामुळे आम्ही जेव्हा भेटलो, तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर लगेच मिसळून गेलो. शाहीद कित्येकवेळा आमच्याबरोबर नसायचा. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा मला भेटायचा, तेव्हा तेव्हा आम्ही दोघे एकमेकांबरोबर गोडीगुलाबीने वागायचो.”

हेही वाचा- “कुणालाही गुलाम म्हणून…” अनुराग कश्यपचं हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलचं विधान चर्चेत

सुप्रिया पाठक पुढे म्हणाल्या, “माझ्या आईचा माझ्या आणि पंकज कपूर यांच्या लग्नाला विरोध होता. आम्हाला दोन मुलं झाल्यानंतरही तिला माझ्या लग्नाची चिंता होती. तिला वाटायचं मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण, माझी बहिणी रत्नाचा मला यासाठी मोठा पाठिंबा मिळाला.”

हेही वाचा- “वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…”

सुप्रिया यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर लवकरच त्या ‘खिचडी २’ चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘खिचडी’ मालिकेवर आधारित या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘खिचडी २’ मध्ये सुप्रिया पाठक यांच्याबरोबर राजीव, वंदना आणि कृती यांची मुख्य भूमिका आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader