Mouni Roy and Suraj Nambiar divorce : लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि पती सूरज नांबियार हे घटस्फोट घेत आहेत. सूरज नांबियारने मौनीची आर्थिक फसवणूक केली आणि तिच्या प्रसिद्धीचा वापर करुन घेतल्याचा दावा करण्यात येत होता. यावर सूरज नांबियारने पोस्ट करुन स्पष्टपणे मत मांडले आहे. पोटगी किंवा कोणत्याही प्रकारच्या पैशांमुळे विभक्त होत नसून या निर्णयामध्ये तिसरी व्यक्ती नसल्याचे देखील सूरज नांबियारने स्पष्ट केले.

वैवाहिक नात्यामध्ये मौनीची फसवणूक झाल्याचे आणि दोघांमध्ये आर्थिक व्यवहार व मित्र-मैत्रिणींचा हस्तक्षेप यावरुन वाद असल्याचे बोलले जात आहे.
यावर सूरज नांबियारने सोशल मीडियावर पोस्ट करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या नात्यामध्ये कोणतीही तिसरी व्यक्ती नसून आम्ही एकमेकांचा आदर ठेवून वेगळे होत असल्याचे सूरजने स्पष्ट केले. तसेच व्हायरल होत असलेल्या पोस्ट या पूर्णपणे चुकीच्या आहेत. निराधार आणि द्वेषपूर्ण आहेत, अशी नाराजी सूरजने व्यक्त केली.

तिसऱ्या व्यक्तीला विनाकारण यात ओढणं अत्यंत चुकीचं – सूरज

सूरजने पुढे लिहिले की, मी आणि मौनी विभक्त होत असलो तरी आमच्यामध्ये कोणतीही पोटगी किंवा वाद नाही. आम्ही कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे वेगळे होत नाही. आम्ही एकमेकांच्या मतांचा पूर्णपणे आदर करून परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हे एकमेव सत्य असून बाकी सर्व लोकांच्या कल्पना आहेत. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केलेली असताना जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे आणि यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला विनाकारण ओढणे हे अत्यंत चुकीचे आहे. आमच्या निर्णयामध्ये आमच्या मित्र परिवाराचा काहीही संबंध नसल्याचेदेखील सूरज नांबियार याने स्पष्टपणे सांगितले आहे.

काही माध्यमांकडून चुकीचे आणि तथ्य नसलेले दावे

या कठीण वेळेमध्ये मौनी आणि मी एकमेकांचा मान राखत आहोत, त्यामुळे आमच्या नात्याबाबत वार्तांकन करतानाही आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल, अशी अपेक्षा आहे. काही माध्यमांकडून चुकीचे आणि तथ्य नसलेले दावे केले जात आहेत. याची कोणतीही तपासणी किंवा पडताळणी न करता ते लिहिले जात आहेत हे अत्यंत अन्यायकारक असून, ते गप्पपणे सहन करावे अशी माझी इच्छा नाही; अशा शब्दांत चुकीचे दावे करणाऱ्या रिपोर्टवर सूरज नांबियारने नाराजी व्यक्त केली आहे.

लग्नाच्या ४ वर्षांनंतर घटस्फोट

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने पती सूरजला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याने घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. दुबईमध्ये स्थायिक असलेला सूरज मूळचा बंगळुरूचा आहे. जवळपास २-३ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर मौनी आणि सूरजने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याने जानेवारी २०२२ मध्ये गोव्यात मल्याळी आणि बंगाली पद्धतीने विवाह केला होता. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघंही विभक्त झाले आहेत.