Suresh Oberoi On Vivek Oberoi Aishwarya Rai Salman Khan: बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त आणि चर्चिल्या गेलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचं नातं. या जुन्या नात्यावर विवेकचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी प्रतिक्रिया दिली. विवेकने त्यांना या नात्याबद्दल कधीच सांगितलं नव्हतं; तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांना पहिल्यांदा याबद्दल माहिती दिली होती. तसेच, सलमान खान व त्याचे कुटुंबीय आणि अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचं नातं कसं आहे, त्याबद्दलही त्यांनी सांगितलं.

“बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. विवेकने मला त्याबद्दल कधीच सांगितलं नाही. रामू (राम गोपाल वर्मा) यांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. रामूच्या आधी मला अजून कुणीतरी सांगितलं होतं, त्यावेळी मी विवेकला समजावलं होतं की हे सगळं करू नकोस,” असं ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश विवेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल म्हणाले.

सलमान खानबद्दल सुरेश ओबेरॉय म्हणाले…

सुरेश यांनी सलमान खान आणि सलीम खान यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. “मी त्यावेळी आणि आताही विवेकच्या प्रकरणात निश्चिंत होतो. आम्ही सगळे एकमेकांना खूप छान भेटतो. जेव्हाही सलमान खान मला भेटतो तेव्हा तो सिगारेट लपवतो आणि नंतर आदराने माझ्याशी बोलतो. मी नेहमी विवेकला सलीमजींच्या पाया पडायला सांगतो. मी सलीम भाईंचा आदर करतो. काही गोष्टी घडल्या पण माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत,” असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं नातं कामापुरतं – सुरेश ओबेरॉय

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल विचारल्यावर सुरेश ओबेरॉय म्हणाले, “मी त्यांचा कधीच मित्र नव्हतो. मी त्यांचा को-स्टार होतो. आमचं नातं कामापुरतं होतं. माझी मैत्री डॅनी- मुकुलशी होती. होय, मिस्टर बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलं होतं, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आणि ते बऱ्याच गोष्टी लोकांना कळू देत नाहीत. मात्र जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप छान वागतो.”

सलमान खान-ऐश्वर्या रायचं ब्रेकअप अन् विवेक ओबेरॉयची एंट्री

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रेमात पडले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. सलमानचा रागीट स्वभाव आणि संशयी वृत्तीमुळे त्यांच्यात वाद सुरू झाले. २००२ मध्ये ऐश्वर्याने हे नातं संपवलं. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिनेता विवेक ओबेरॉयची एंट्री झाली. ‘क्युं! हो गया ना…’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ते एकमेकांना डेट करू लागले. पण नंतर विवेक व ऐश्वर्याचंही ब्रेकअप झालं. पुढे काही वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं, तर विवेक ओबेरॉयने प्रियांका अल्वाबरोबर संसार थाटला.