फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारणातही गदारोळ उठवणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलंय. अभिनेत्याच्या निधनाच्या तब्बल अडीच वर्षांनी कूपर रुग्णालयाती पोस्टमॉर्टम विभागातील कर्मचाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याची हत्या झाली होती आणि त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण होते, असं कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी म्हटलंय. त्यांच्या या नवीन दाव्यानंतर सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा काय?

“सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
pune crime news, life imprisonment, man who killed his wife
पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर तब्बल ३७ वार करून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप

“सुशांतची हत्या झाली होती, पण अधिकाऱ्यांनी…”; कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

या दाव्यावर सुशांतच्या वकिलांची प्रतिक्रिया काय?

ETimes शी बोलताना वकील विकास सिंह यांनी आपल्याकडे सुशांतला झालेल्या दुखापतींबद्दल कोणतीही थेट माहिती नाही, असं म्हटलंय. “सुशांतच्या बहिणींनी मला याबद्दल सांगितलं नसल्यामुळे मी यावर भाष्य करू शकणार नाही. पण सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही साधी आत्महत्या नव्हती, त्यामागे कट होता आणि केवळ सीबीआयच त्याच्या मृत्यूमागील कट उलगडू शकेल,” असं विकास सिंह यांनी म्हटलंय.

“व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने उपस्थित केला प्रश्न

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. अशातच आता कूपरमधील कर्मचारी व सुशांतच्या वकिलांनी संशय व्यक्त केल्याने प्रकरण आणखी कोणतं वळण घेतंय, हे पण पाहणं महत्त्वाचं ठरेल.