scorecardresearch

Premium

Video : भरधाव वेगाने ओव्हरटेक, ट्रक पलटी अन् फेरारी कार…; ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कार अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर

या चित्रपटात शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली.

gayatri joshi car accident video
गायत्री जोशी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या स्वदेस चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून गायत्री जोशीला ओळखले जाते. नुकतंच तिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या रस्ते अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय या दोघांना दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ गायत्री जोशीच्या कार अपघातावेळीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत एका मिनी ट्रकच्या बाजूने अनेक आलिशान गाड्या या भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत. गायत्री जोशी तिचा पती विकास ओबेरॉयसह लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होते. यादरम्यान एका गाडीने मिनी ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी त्यांच्या लॅम्बोर्गिनी कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे पुढे असलेला मिनी ट्रक हवेत उडाला आणि पलटी झाला. तसेच जवळच्या फेरारी कारला आग लागली. या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा : ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

samantha ruth prabhu on working with salman khan
आजारपणासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर समांथा प्रभू झळकणार सलमान खानबरोबर? अभिनेत्री म्हणाली, “माझ्या कम्फर्ट झोनमधून…”
Jai Jai Swami Samartha fame actor Akshay Mudwadkar
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर लवकरच नव्या भूमिकेत; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार
hemangi dance
शाहरुख खानचा ‘जवान’ पाहताना हेमांगी कवीला आवरला नाही नाचण्याचा मोह, अभिनेत्रीचा चित्रपटगृहातील व्हिडीओ व्हायरल
Allu
अल्लू अर्जुनने पहिला शाहरुख खानचा ‘जवान’, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला, “चित्रपटाचे निर्माते…”

हा भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडल्याचे समोर आलं आहे. यावेळी गायत्री जोशी ही निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी गाडीतून प्रवास करत होती. या घटनेवेळी मागून येणारी एक गाडी व्हिडीओ शूट करत होती. त्या गाडीतीलच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान स्थानिक वृत्तावाहिनीशी बोलताना गायत्री जोशीने ती सुखरुप असल्याचे म्हटलं आहे. “मी आणि विकास इटलीमध्ये आहोत. इथे आमचा अपघात झाला, पण देवाच्या कृपेने आम्ही पूर्णपणे ठीक आहोत”, असे गायत्री जोशीने म्हटले. गायत्री जोशीने २००४ मध्ये ‘स्वदेस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. पण या चित्रपटानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. यानंतर काही वर्षांनी तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swades actress gayatri joshi car accident horrific video viral on social media nrp

First published on: 04-10-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×