बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने २३ सप्टेंबरला एका गोड मुलीला जन्म दिला. स्वराने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळत आहे. हेही वाचा : Video : “वाहती नदी, चुलीवरचा भात अन्…”, मराठमोळा अभिनेता पोहोचला कोकणात; म्हणाला, “माझं गाव..” सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो शेअर करत स्वराने तिचं नाव उघड केलं आहे. अभिनेत्री लिहिते, "एक प्रार्थना पूर्ण झाली आणि आम्हाला एक आशीर्वाद मिळाला. कधीकधी तुमच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतात. आमच्या मुलीचा म्हणजेच राबियाचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. आम्ही कृतज्ञ आहोत…तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद!" हेही वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…” स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवलं आहे. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. https://www.instagram.com/p/CxndU9jLIJw/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, जानेवारी महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली होती. एक महिन्यानंतर लग्नाचे फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा आणि अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.