Premium

अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पहिला फोटो शेअर करत सांगितलं नाव…

अभिनेत्री स्वरा भास्कर झाली आई, शेअर केली मुलीची पहिली झलक, काय ठेवलं नाव?

swara bhaskar welcomes a baby girl
स्वरा भास्करला झाली मुलगी, फोटो केले शेअर

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने २३ सप्टेंबरला एका गोड मुलीला जन्म दिला. स्वराने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “वाहती नदी, चुलीवरचा भात अन्…”, मराठमोळा अभिनेता पोहोचला कोकणात; म्हणाला, “माझं गाव..”

सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो शेअर करत स्वराने तिचं नाव उघड केलं आहे. अभिनेत्री लिहिते, “एक प्रार्थना पूर्ण झाली आणि आम्हाला एक आशीर्वाद मिळाला. कधीकधी तुमच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतात. आमच्या मुलीचा म्हणजेच राबियाचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. आम्ही कृतज्ञ आहोत…तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद!”

हेही वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…”

स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवलं आहे. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली होती. एक महिन्यानंतर लग्नाचे फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा आणि अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swara bhaskar and husband fahad welcomes a baby girl actress shares picture on social media sva 00

First published on: 25-09-2023 at 20:19 IST
Next Story
शाहरुख की रणवीर हा वाद सोडाच; पण मूळ ‘डॉन’ चित्रपटही बिग बींच्या आधी ‘या’ तीन कलाकारांना ऑफर झाला होता