scorecardresearch

‘तो’ लेहेंगा पाकिस्तानातून भारतात आणला कसा? खुद्द स्वरा भास्करनेच दिली माहिती, म्हणाली…

आपल्या लग्नाच्या रिसेस्पशनमध्ये पाकिस्तानी डिझायनरने डिझाईन केलेला लेहेंगा घाल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच ट्रोल झाली आहे.

swara-bhasker-fahad-ahmed
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद (छायाचित्र जनसत्ता)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच लग्न चांगलच चर्चेत आलं आहे. दिल्लीतील रिसेप्शननंतर स्वराचे रिसेप्शन तिच्या सासरच्या बरेली येथे झाले. या भव्य कार्यक्रमात फहादचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. स्वराच्या रिसेप्शनचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्वरा पाकिस्तानी लूकमध्ये दिसत आहे. स्वराने तिच्या रिसेप्शनमध्ये पाकिस्तानातून आणलेला लेहेंगा परिधान केला होता. मात्र, हा लेहेंगा पाकिस्तानातून भारतात नेमका आला कसा? याबाबत खुद्द स्वराने पोस्ट करुन माहिती दिली आहे.

हेही वाचा- ‘पाकिस्तावरील तुझं प्रेम…’; रिसेप्शनमध्ये सीमेपलीकडून आलेला लेहेंगा परिधान केल्याने स्वरा भास्कर ट्रोल

ट्वीटच्या माध्यमातून रिसेप्सशनचे फोटो शेअर करताना स्वराने सांगितले की, तिचा हा पाकिस्तानी लेहेंगा लाहोरवरुन दुबईला पोहचला त्यानंतर दुबईहून मुंबईत आणि मुंबईवरून तो बरेलीत आणण्यात आला. यासाठी तिने AliXeeshanTheatreStudio चे आभार मानले आहेत

हेही वाचा- थकलेला चेहेरा, डोळ्यात दाटलेलं पाणी; मृणाल ठाकूरने ‘तो’ फोटो शेअर करत मांडली तिची व्यथा

स्वरा-फहादने बरेलीतील ‘द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट’मध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी स्वराच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे. स्वराने पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. लेहेंग्यावर पाकिस्तानी एम्ब्रॉयडरी केलेली होती. स्वराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मोठी नाकाची अंगठी आणि माथा पट्टी घातली होती. यासोबतच स्वराने कानात मोठे झुमके आणि गळ्यात सुंदर चोकर नेकलेस घातला होता. तिने हातात बांगडी व मोठी अंगठी घालून लूक पूर्ण केला. तर फहादने पांढरी शेरवानी आणि पांढरा आणि सोनेरी दुपट्टा असलेला सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता.

हेही वाचा- भर कार्यक्रमात कचरा उचलताना दिसला रणवीर सिंग; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंगसाठी…”

फवादनेही मानले चाहत्यांचे आभार

फहादने आपल्या सोशल मीडियावर रिसेप्शनचा फोटोही शेअर केला आहे आणि लिहिले की, “गेल्या महिन्याभरातील तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आम्ही दोघेही धन्य आणि कृतज्ञ आहोत.”

पाकिस्तानी लेहंग्यामुळे स्वरा ट्रोल

स्वरा भास्करचा रिसेप्सनचा फोटो पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने तिला घाघरा-ए-मुमताज म्हणलं आहे. तर एकाचे स्वराचे ‘पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे’, अशी कमेंट केली आहे. यासोबतच एका युजरने त्याला टॅग केले आणि लिहिले की ही राष्ट्रीय लाजिरवाणी आहे. एका यूजरने तिला तुकडे-तुकडे गँगचा भाग म्हटले आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करच्या नावावर अशा कमेंट्सचा वर्षाव सातत्याने होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:32 IST

संबंधित बातम्या