scorecardresearch

‘इंकलाब जिंदाबाद’, महात्मा गांधींचा फोटो अन्…; स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची पत्रिका समोर

swara bhaskar wedding card
स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची पत्रिका व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात लग्नाची बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. स्वराने जानेवारी महिन्यात समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं. लग्नाचा व्हिडीओ शेअर करत स्वराने ही माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता पारंपरिक पद्धतीने स्वरा फहादशी लग्नगाठ बांधणार आहे.

स्वराच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. दिल्लीतील आजी-आजोबांच्या घरी स्वरा फहादबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. ११-१६ मार्च दरम्यान स्वरा व फहादच्या लग्नापूर्वीचे मेहेंदी, हळदी व संगीत कार्यक्रम पार पडणार आहेत. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत स्वरा व फहादच्या पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. जवळच्या नातेवाईकांना स्वरा व फहादच्या लग्नाचं आमंत्रणही देण्यात आलं आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही समोर आली आहे.

हेही वाचा>> …म्हणून राज कपूर तृतीयपंथियांबरोबर होळी साजरी करायचे! काय होतं नेमकं कारण?

हेही वाचा>> “जुन्या साड्या नेसू नको” आशुतोषबरोबर लग्न केल्यानंतर नेटकऱ्यांचा अरुंधतीला अजब सल्ला, म्हणाले “दोन वाट्यांचं मंगळसूत्र…”

स्वरा व फहादच्या लग्नाची पत्रिका खूपच खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावचा संदेश या पत्रिकेतून देण्यात आला आहे. ‘इंकलाब जिंदाबाद’, ‘हम सब एक है’, ‘हम भारत के लोग’ असे हातात फलक असलेले लोक पत्रिकेवर दाखवण्यात आले आहेत. या पत्रिकेवर महात्मा गांधींचा फोटोही आहे. याशिवाय दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेचं पोस्टरही पत्रिकेवर आहे. स्वरा व फहाद हा खिडकीतून हे दृश्य पाहत असल्याचं पत्रिकेवर दिसत आहे. स्वरा व फहादच्या पत्रिकेचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> Video: एकेकाळी छोट्याशा घरात राहत होती अनुष्का शर्मा, अभिनेत्री जुन्या घराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहादशी कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 17:18 IST