बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या विधानामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती सपा नेते फहाद अहमदसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. स्वरा भास्कर ट्विटरवर खूप सक्रिय असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडत असते. अनेकदा तिला यासाठी ट्रोलही व्हावे लागले आहे. दरम्यान स्वरा आज पुन्हा चर्चेत आली आहे. स्वराने तिच्या नवऱ्यांच्या पहिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराने सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले आहेत. स्वराच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा आहे.
आता स्वराची सवत म्हणलं तरी अनेकांना प्रश्न पडला असेल की, फहादचं पहिलं लग्न झालयं का? पण फवादचं पहिले लग्न झालेलं नसून स्वरानं सवत म्हणत शुभेच्छा दिलेली व्यक्ती फवादचा जवळचा मित्र आहे. ज्याला स्वरा तिची सवत मानते.
हेही वाचा- “शाहरुख खान बॉलीवूड इंडस्ट्रीच्या बाहेरचा व्यक्ती पण…”; मनोज बाजपेयींचे किंग खानबाबत मोठं विधान
स्वरा भास्करने पोस्टमध्ये लिहिलं आहे आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा खरा जोडीदार अरिश कमर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. याबरोबरच स्वराने नेहमीच तिच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, तिची सर्व न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केली जातील याची खात्री केल्याबद्दल, त्याच्यासाठी साक्षीदार झाल्याबद्दल आणि तिची आतापर्यंतची सर्वोत्तम ‘सवत’ असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहे. स्वराची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी या पोस्टवर मजेशीर कमेंट करत आहेत.
स्वरा भास्कर हिने ६ जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर रजिस्टर लग्न केले. महिनाभर लग्नाची बातमी गुलदस्त्यात ठेवल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी त्यांचे लग्न झाले असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मार्च महिन्यात तिने दिल्लीला तिच्या आजी-आजोबांच्या घरी हळद-मेहंदी असे लग्नापूर्वीचे कार्यक्रमही केले. या लग्नामुळे ती गेले काही दिवस खूप चर्चेत होती.