scorecardresearch

Premium

“आधी गरोदर राहायचं आणि मग…”, लग्नाच्या चार महिन्यांतच गुडन्यूज दिलेल्या स्वरा भास्करवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले…

“लग्नाचं खरं कारण…”, स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

swara-bhasker-troll (4)
स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. स्वराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. स्वरा व फहाद अहमद लवकरच आईबाबा होणार आहेत. स्वराने जानेवारी महिन्यात फहाद अहमदशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार महिन्यांनंतर स्वरा गरोदर आहे. ऑक्टोबर महिन्यात स्वरा बाळाला जन्म देणार असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. लग्नाआधीच स्वरा गरोदर असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. “लग्नाचं खरं कारण समोर आलं आहे,” अशी कमेंट एकाने केली आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
swara-bhasker-troll

हेही वाचा>> “मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”, TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “बारामतीतील सुपुत्र…”

“लग्न करण्यामागचं हेच कारण आहे,” असं म्हटलं आहे.

swara-bhasker-troll

“गडबड होती म्हणूनच निकाह झाला,” अशी कमेंटही केली आहे.

swara-bhasker-troll

“या बातमीमुळे काहीही आश्चर्य वाटलं नाही. तुम्हाला वाटते तितके आम्ही मुर्ख नाही आहोत,” असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “आधी गरोदर राहायचं मग लग्न करायचं, बॉलिवूडमध्ये हा नवीन ट्रेंड आला आहे,” अशी कमेंट करत स्वराला ट्रोल केलं आहे.

swara-bhasker-troll

स्वरा व फहाद अहमदने जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. एक महिन्यानंतर फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा व अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. आता ते लवकरच आईबाबा होणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 14:06 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×