‘रांझणा’, ‘तनू वेड्स मन’ अशा चित्रपटांमुळे स्वरा भास्कर घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री कायम तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. स्वरा भास्कर सोशल मीडियावर नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं स्पष्ट मत मांडत असते. अशातच स्वराने नुकतीच शेअर केलेली एक एक्स पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका प्रसिद्ध फूड ब्लॉगरच्या पोस्टवर टीका केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

प्रसिद्ध फूड ब्लॉगर नलिनी उनागरने एक्सवर तिच्या जेवणाच्या ताटाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये फ्राईड राईस आणि पनीर असे पदार्थ होते. या फोटोला नलिनीने “मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे. कारण, माझी प्लेट अश्रू, क्रूरता आणि असंख्य अपराधांपासून पापमुक्त आहे” असं कॅप्शन दिलं होतं. यावर स्वराने प्रतिउत्तर देत या ब्लॉगरला खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा : Video : मैनू विदा करो…; ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील पिहूने अरिजित सिंहचं गाणं गात प्रेक्षकांचे मानले आभार, जुन्या आठवणींना दिला उजाळा

स्वरा या पोस्टवर आपली प्रतिक्रिया देत लिहिते, “खरं सांगायचं झालं, तर मला शाकाहारी लोकांचा हा स्वार्थीपणा खरंच लक्षात येत नाही. कारण, तुम्ही तुमचं डाएट फॉलो करताना… गायीच्या वासराला त्याच्या आईच्या दूधापासून वंचित ठेवणे, गायींना जबरदस्ती गर्भवती करून घेणे, या गायींना त्यांच्या वासरांपासून वेगळं करणे, या गायींचं दूध चोरणे या गोष्टी करता. याशिवाय तुम्ही मूळ भाज्या काढून खाता. यामुळे संपूर्ण वनस्पती नष्ट होते. जमल्यास आजचा दिवस आराम करा कारण, आज बकरी ईद आहे.” या पोस्टच्या पुढे स्वराने हात जोडल्याचे इमोजी दिले आहेत.

हेही वाचा : “बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही”, ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “अचानक एकेदिवशी…”

दरम्यान, स्वराने केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिचं समर्थन केलं आहे. तर काही युजर्सनी या भूमिकेमुळे स्वराला पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. याशिवाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्पष्टवक्तेपणामुळे अनेक कामं माझ्या हातातून गेली असं सांगितलं आहे. “स्पष्टवक्तेपणाचा माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होत आहे.” असं तिने म्हटलं आहे.