scorecardresearch

“तलवार व पेट्रोल बॉम्ब घेऊन आमच्या घराबाहेर…” तापसी पन्नूने सांगितला दंगलीचा थरारक प्रसंग

तापसी पन्नूने सांगितला दंगलीचा थरारक प्रसंग

taapsee pannu
तापसी पन्नूने सांगितला दंगलीचा थरारक प्रसंग. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तापसी पन्नू बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा २’ यांसारख्या चित्रपटांतून तापसीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तापसीने एका मुलाखतीत १९८४ मध्ये झालेल्या दंगलीचा एक भयानक किस्सा सांगितला.

तापसीने ‘लल्लनटॉप’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलखतीत तिने १९८४ मध्ये दिल्लीत सीख समुदायाच्या विरोधात झालेल्या दंगलीबाबत भाष्य केलं. या दंगलीमध्ये तापसीच्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. दंगलीचा भयानक किस्सा सांगताना तापसी म्हणाली, “त्यावेळ माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं नव्हतं. माझी आई दिल्लीतील पूर्व भागात राहत होती. तर माझे वडील शक्ती नगर येथे वास्तव्यास होते. १९९८४च्या दंगलीबाबत मला काहीही माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी जेवढं सांगितलं तेवढंच माझ्या लक्षात आहे”.

हेही वाचा>>“किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये”, अजित पवारांच्या पत्नीने किरण मानेंना फोन केला अन्…

हेही वाचा>> “तुला वॅक्सिंग करण्याची गरज आहे” हॉट फोटो शेअर केल्यामुळे ४३ वर्षीय अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “सून येण्याच्या वयात…”

“माझी आई राहत होती तिथे कोणताच धोका नव्हता. परंतु, शक्ती नगरमध्ये सीख कुटुंब असलेलं फक्त वडिलांचे घर होतं आणि लोकांना हे माहीत होतं. घराबाहेर नेहमी आमची जोंगा गाडी उभी असायची. दंगल करणारे लोक तलवार आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन घराजवळ आले. त्यांना बघताच घरातील सगळ्या लाईट्स बंद करण्यात आल्या. घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नच करू शकत नव्हते. कारण घराबाहेर दंगल करणाऱ्या लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कुटुंबीय घरातच लपले होते”, असंही पुढे तिने सांगितलं.

हेही वाचा>> “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

पुढे तापसी म्हणाली, “वडील राहत होते त्या इमारतीत चार कुटुंबीय राहत होते. त्यातील आमचंच कुटुंब सीख होतं. बाकी तीन हिंदू होते. दंगल करणारे लोक गेटजवळ येताच त्यांनी आमच्या कुटुंबियांबाबत हिंदू कुटुंबियांना विचारलं. आम्ही पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दंगल करणाऱ्यांनी घराबाहेर असलेली जोंगा गाडी जाळून टाकली. इमारतीतील इतर लोकांमुळेच तेव्हा माझ्या कुटुंबियांचा जीव वाचला”.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 16:36 IST
ताज्या बातम्या