Tanisha Mukerji Aditya Chopra: बॉलीवूड अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिने आपल्या अभिनय कारकिर्दीतील अनेक गुपिते उघड केली आहेत. २००५ मध्ये आलेल्या यशराज फिल्म्सच्या ‘नील एन निक्की’ चित्रपटासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, ही मेहनत तिच्या आरोग्यासाठी महागात पडली. तनिषाने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्राने तिला लूक बदलण्याची अट घातली होती. “तू अशी दिसू शकत नाहीस,” असे आदित्यने स्पष्ट केल्यावर तनिषाने कडक डाएट आणि व्यायाम सुरू केला. मात्र, या अतिरेकामुळे तिला ‘हार्मोनल इम्बॅलन्स’चा गंभीर त्रास झाला. चित्रपटाच्या अपयशापेक्षा आरोग्याच्या या समस्यांनी तिला जास्त ग्रासले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची कन्या तनिषा मुखर्जी हिने २००० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांइतकं यश तिला मिळालं नाही. तनिषाच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण म्हणजे तिला यशराज फिल्म्सचा ‘नील एन निक्की’ हा चित्रपट मिळाला होता. या चित्रपटात ती उदय चोप्राबरोबर मुख्य भूमिकेत होती. आता तनिषाने या चित्रपटाशी संबंधित काही आठवणी सांगितल्या आहेत.
या भूमिकेसाठी आदित्य चोप्राने तिला या सिनेमात काम करण्यासाठी बॉडी ट्रान्सफॉर्म करण्यास सांगितली होती. मात्र, कडक डाएट आणि व्यायामामुळे तिला नंतर ‘हार्मोनल इम्बॅलन्स’ची समस्या झाली. ‘मामाराझी’शी बोलताना तनिषा म्हणाली की, या चित्रपटासाठी राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्राने तिची स्क्रीन टेस्ट घेतली होती. याआधी आदित्यने तिला करिअरबद्दल काही सल्ले दिले होते, पण ते तिने ऐकले नाहीत. पण यावेळी मात्र तिने सांगितलेलं सगळं करण्यास होकार दिला. तनिषाने सांगितलं की, जेव्हा या चित्रपटासाठी पहिलं फोटोशूट झालं, तेव्हा आदित्य चोप्राने तिला “तू अशी दिसू शकत नाहीस,” असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर तनिषाने आपल्या शरीरयष्टीवर काम करण्यास सुरुवात केली.
‘मला हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास झाला’
तनिषाने आपल्या आहारात आणि व्यायामात योग्य ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे काटेकोरपणे पालन केले. मात्र, शरीरासाठी अशा प्रकारचे कडक नियम जास्त काळ पाळता येत नाहीत, असं तिने नमूद केलं. ती म्हणाली, “जर तुम्ही असा कडक दिनक्रम जास्त काळ चालू ठेवला, तर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होऊ शकतो, जो मला झाला.”
‘नील एन निक्की’च्या अपयशाबद्दल तनिषा म्हणाली…
अर्जुन सबलोक दिग्दर्शित ‘नील एन निक्की’ हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्यावर प्रचंड टीका झाली होती. तनिषा म्हणाली की, तिने ही टीका मनाला लावून घेतली नाही, उलट त्याकडे सकारात्मकतेने पाहिलं. “प्रेक्षकांना असं का वाटलं? हे समजून घेण्यासाठी मी पुन्हा तो चित्रपट पाहिला. मी स्वतःच्या कामाकडे खूप तटस्थपणे पाहते.” तनिषा स्वतःच्या कामाबद्दल समाधानी होती, पण आता मागे वळून पाहताना तिला वाटतं की काही दृश्यांमध्ये तिने अधिक चांगला अभिनय करायला हवा होता.
चित्रपटाच्याTanisha Mukerji Health Issues: अभिनेत्री तनिषा मुखर्जीने ‘नील एन निक्की’ चित्रपटासाठी केलेल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. आदित्य चोप्राच्या सांगण्यावरून वजन कमी करण्याच्या नादात तनिषाला ‘हार्मोनल इम्बॅलन्स’चा त्रास सुरू झाला. या कठीण प्रवासावर तिने आता पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अपयशाबद्दल बोलताना तनिषा म्हणाली की, या अपयशाची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी कधीही स्वतःला जबाबदार धरलं नाही. “दिग्दर्शक एखाद्या अभिनेत्याला जेवढं सांगतो, तेवढंच काम अभिनेता करतो. दिग्दर्शकाची जी मागणी असेल, अभिनेता तीच पूर्ण करतो. प्रत्येक अभिनेत्याच्या कामाला काही मर्यादा असतात. कॅमेरा, लायटिंग आणि इतर तांत्रिक गोष्टींच्या साहाय्याने त्या दृश्याचं सोनं करणं हे सर्वस्वी दिग्दर्शकाच्या हातात असतं. अभिनेत्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेणं हे दिग्दर्शकाचे कौशल्य आहे,” असं तनिषाने सांगितलं.
तनिषा मुखर्जी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात दिसली होती.
