Tanushree Dutta Controversial Statement Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. तनुश्रीने ‘दृष्ट व्यक्तीचं निधन’ असं म्हटल्यावर मोठा वाद निर्माण झाला. ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) तनुश्रीच्या या वक्तव्याचा निषेध केला, पण तरीही तनुश्री तरीही आपल्या विधानावर ठाम राहिली.
“गेल्या पाच वर्षांत MeToo नंतर मी कठीण परिस्थितीतून गेले. मला प्रचंड त्रास सहन करावा लागला, त्यामुळे प्लीज माझ्या दृष्टिकोनातूनही याकडे पाहा. ज्या लोकांवर अत्याचार झाले आहेत, ज्यांना त्रास दिला गेला आहे. ही केस सुरू असताना ती मागे घेण्यासाठी खूप दबाव आणला गेला. तरीही मी केस मागे घेतली नाही. मला अनेक प्रकारची आमिषे दाखवण्यात आली, पण तरीही मी केस मागे घेतली नाही. त्यानंतर मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. माझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले, माझा अपघात झाला आणि मला अन्नातून विषबाधा झाली. मी ज्या ज्या गोष्टींमधून गेले, ते पाहता प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मी माझ्या दृष्टिकोनातून या घटनेबद्दल बोलत आहे,” असं तनुश्री दत्ता म्हणाली.
गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर काही तासांतच तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या प्रतिक्रिया दिली होती. तिने लिहिलं, “मी ही बातमी ऐकली. आज माझा कामाचा दिवस आहे. मी एका कार्यक्रमासाठी लखनऊला जात आहे आणि मला त्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे.”
किती विचित्र दिवस आहे – तनुश्री दत्ता
तनुश्री पुढे म्हणाली, “हे सर्व आजच घडलं, किती विचित्र दिवस आहे. मी लखनऊमध्ये खूप मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि माझा संपूर्ण दिवस आधीच ठरलेला होता. मला लाइव्ह यायचं होतं, कंटेंट पोस्ट करायचा होता. आता मला काळजी वाटतेय की संध्याकाळी संपूर्ण मीडियाला फक्त दुष्ट व्यक्तीच्या निधनाच्या बातमीतच रस असेल. त्यामुळे मला नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी, हे ठरवल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन.”
AICWA ने तनुश्री दत्ताच्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध
तनुश्रीच्या वक्तव्याचा AICWA चे अध्यक्ष सुरेश श्यामल लाल यांनी समाचार घेतला. तिने हे वक्तव्य प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचं त्यांनी म्हटलं. “अशा दुःखाच्या वेळी तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर ‘दुष्ट व्यक्तीचा मृत्यू’ अशी टिप्पणी केली. ती अत्यंत आक्षेपार्ह, असंवेदनशील आणि लाजीरवाणी आहे. AICWA याचा तीव्र निषेध करते,” असं सुरेश लाल म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत आपल्या चित्रपटसृष्टीत कोणाच्याही निधनानंतर कोणत्याच व्यक्तीने असं वक्तव्य केलेलं नाही. तू पहिलीच आहेस आणि शेवटची ठरावी हीच आमची प्रार्थना आहे. अशा प्रसंगी काय बोलावे आणि कधी गप्प राहावे, याची जाणीव इंडस्ट्रीतील लोकांना आहे. तू तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवं होतंस.”
