Tanushree Dutta Shocking claims about Nana Patekar Death : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने धक्कादायक दावे केले आहेत. नाना पाटेकर जिवंत असल्याचा दावा करत, त्यांचा मृतदेह कुणीही का पाहिला नाही? असा सवाल तिने केला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि प्रार्थना सभा न होणं, याबद्दल तनुश्रीने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, या प्रकरणात डीएनए टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे.
सोमवारी रात्री इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. लोकांना एवढ्या मोठ्या कलाकाराचे अंतिम दर्शन का घेऊ दिले नाही आणि त्यांचे अंत्यसंस्कार एवढ्या रात्री घाईघाईत का करण्यात आले? असा प्रश्न तिने विचारला. तसेच फिल्म इंडस्ट्री आणि मीडियामधील कोणत्याही व्यक्तीने नाना पाटेकर यांचा मृतदेह पाहिलेला नाही, असा दावा अभिनेत्रीने केला आहे.
कोणीही नाना पाटेकरांचे पार्थिव पाहिलेले नाही- तनुश्री दत्ता
तनुश्री म्हणाली, “बॉलीवूड इंडस्ट्री आणि मीडियामध्ये कोणीही नाना पाटेकर यांचा मृतदेह पाहिलेला नाही. मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई कशासाठी होती? हिंदू धर्मानुसार साधारणपणे सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत, पण त्यांचे अंत्यसंस्कार रात्री ११:२८ वाजता करण्यात आले. रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार करण्याची काय घाई होती? त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचा चेहरा नीट पाहिला होता का?”
नाना पाटेकरांच्या अंत्यदर्शनासाठी प्रार्थना सभा का ठेवली नाही? – तनुश्री दत्ता
नाना पाटेकर यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या निधनानंतर प्रार्थना सभा का ठेवली नाही? असा सवाल तनुश्रीने केला. “इतक्या मोठ्या दिग्गजासाठी प्रार्थना सभा व्हायला हवी होती, जेणेकरून बॉलीवूड लोक त्यांना श्रद्धांजली वाहू शकले असते आणि त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकले असते. हिंदू परंपरेनुसार लोक अंत्यदर्शन घेतात, मृतदेहाला स्पर्श करून नमस्कार करतात. लोकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली, पण त्यांनी त्यांचं पार्थिव पाहिलं का? त्यांचा चेहरा झाकलेला होता. गावातले लोक कदाचित हे प्रश्न विचारणार नाहीत, पण दुसरे मात्र विचारत आहेत की अंत्यसंस्कार नेमके कोणाचे केले?” असं तनुश्री दत्ता म्हणाली.

नाना पाटेकरांना रुग्णालयात नेतानाचा व्हिडीओ का नाही आला? – तनुश्री दत्ता
तनुश्रीने म्हटलं की नानांना रुग्णालयात नेतानाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ का समोर आले नाही. “जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण नाना पाटेकरांचा एकही व्हिडीओ समोर आलेला नाही. त्यांना रुग्णालयात नेलं, तिथे त्यांना मृत घोषित केलं आणि शवविच्छेदन झालं,” असं तनुश्री दत्ता म्हणाली.
नाना पाटेकर जिवंत, तनुश्री दत्ताचा दावा
“ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले ते नानांचं नव्हतं, मला वाटतं की ते सिंगापूर किंवा मलेशियात जिवंत असू शकतात. त्यांनी आपल्या मृत्यूचं नाटक रचलं असावं. एखाद्या कायदेशीर प्रकरणापासून बचावासाठी खोटा मृत्यूचा दाखला बनवला असेल. त्यांनी लूक बदलला असेल, त्यामुळे डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवण्यात यावी,” असं तनुश्री दत्ता म्हणाली.
दरम्यान, नाना पाटेकरांचं ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन जालं. त्यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता गेले काही दिवस सातत्याने नाना पाटेकरांबद्दल पोस्ट करत आहे. २००८ साली आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. नानांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. आता नानांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता रोज नवनवीन दावे करत आहे आणि वादग्रस्त विधानं करत आहेत.
