This Actress Shares Her Strange Experience : भूत, आत्मा, अंधश्रद्धा या गोष्टी अनेकांच्या चर्चेचा विषय असतात. काही जण या बाबतीत विश्वास ठेवतात; तर काही जण ठेवत नाहीत. पण, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीनं मात्र याबद्दलचा तिचा थक्क करणारा अनुभव सांगितला आहे. तिला लहानपणी विचित्र भास व्हायचे.
अनेकांना भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आधीच जाणून घेण्याची उत्सुकता असते; तर काहींना या सगळ्यात काहीच तथ्य वाटत नाही. अशातच अमिताभ बच्चन यांच्या सहअभिनेत्रीने याबद्दलचा तिचा थरारक अनुभव सांगितला आहे. तिला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची आधीच चाहूल लागायची, असा तिचा दावा आहे. ही अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता. तनुश्री दत्ता नेमके काय म्हणालेली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘भागम भाग’, ‘२६ चायना टाऊन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली तनुश्री दत्ता अनेकदा तिची मते, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असते. तनुश्री दत्तानं ‘एबीपी’च्या वृत्तानुसार एका मुलाखतीत तिचा लहानपणीचा थरारक अनुभव सांगितलेला. अभिनेत्री म्हणालेली की, भविष्यात पुढे जेव्हा काही वाईट होणार असतं तेव्हा त्यासंबंधीची माहिती तिला आधीच मिळते. ती खूप आध्यात्मिक आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार असं म्हटलं जातं की, जिथे ३-४ वर्षांच्या लहान मुलांना गोष्टींची नीट समजही नसते तिथे तनुश्रीला आत्मा दिसायचा.
मूळची जमशेदपूर येथून आलेल्या तनुश्रीने २००४ मध्ये ‘मिस युनिवर्स’चा किताब जिंकला होता. त्यानंतर ती हिंदी चित्रपटांतून झळकली. पण, ती अनेकादा वादाच्या भोवऱ्यात अकडलेली असते. तिने Me too अभियानाची सुरुवात केली आणि इंडस्टीत महिला कलाकार , क्रू मेंबर्स यांसह होणाऱ्या समस्या आणि काही सत्य उघडकीस आणले असं म्हटलं जातं. यानंतर बॉलीवूड ते दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याबद्दलचे त्यांचे अनुभव सांगितले आणि खुलासे केले. असे म्हटले जाते की, तनुश्रीने लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरही आरोप केले होते.
सांगितलेला ‘तो’ अनुभव
तनुश्रीने ‘आशिक बनाया आपने’ आणि ‘ढोल’ या चित्रपटांतून नाव कमावले. पडद्यावर तिने बोल्ड भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पण, खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप आध्यात्मिक आहे. लडाखमधील मठात साधना आणि आत्मनिरीक्षण करण्याचा मार्ग निवडणाऱ्या तनुश्रीचे बालपण असाधारण होते. एवढेच काय तर तिने त्या संदर्भातील एक अनुभवसुद्धा सांगितलेला. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अभिनेत्रीने दावा केलेला की, तिच्या परिसरातील एका घरात काहीतरी वाईट घडणार आहे, असं तिला वारंवार जाणवायचं. ती जागा चांगली नाहीये, असं तिचं म्हणणं होतं आणि तिनं तिच्या आईला त्याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर सहा महिन्यांनी त्या घरातील स्त्रीचा मृत्यू झाला, असंही तिनं सांगितल्याचं म्हटलं जातं.
