अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनयापासून दूर आहे, पण सध्या ती राखी सावंतमुळे चर्चेत आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीबरोबर तनुश्रीने एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तिने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच राखीमुळे आपलं लग्न होऊ शकलं नाही, असंही तिने म्हटलं आहे.
तनुश्री म्हणाली, “राखी सावंत अभिनेत्री नाही, बऱ्याच काळापूर्वी तिने २-३ गाणी केली होती. ती ऑफ स्क्रीन सगळा अभिनय करते. पडद्यावर तिने लोकांनी लक्षात ठेवावं असं काम केलेलं नाही. तिने कधीकाळी केलेल्या कामाचा वापर लोकांचे आयुष्य बरबाद करण्यासाठी केला आहे. तिने कामापेक्षा जास्त कॉन्ट्रोव्हर्सी केल्या आहेत. माझ्या तुलनेत तिने काहीच काम केलेलं नाही. पण राखीने जर माझे व्हिडीओ व्हायरल केले नसते तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं.”
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
पुढे ती म्हणाली, “बॉलीवूडमध्ये जर दोन लोकांचा वाद सुरू असेल त्यापैकी एक महिला असेल आणि दुसरा मोठ्या हुद्द्यावर असलेला पुरुष असेल. मी नाव घेणार नाही, पण अशा अनेक घटना घडल्या आहेत. मोठ्या हुद्द्यावर असलेले गुंडांसारखे लोक राखी सावंतसारख्या २-४ जणांना पोसतात. कोणाशीही वाद झाला की ते राखीला फोन करणार, थोडे पैसे देणार मग ही बोलायला सुरू करणार. राखीचं हेच काम आहे. ती पैशांसाठी हे सगळं करते.”
राखीला आपल्याविरोधात बोलण्याचे पैसे मिळाले होते, असा दावा तनुश्रीने केला. “मी इतकी मोठी मीटू मोहीम सुरू केली होती, त्यामुळे अनेकांना माझ्यामुळे अडचणी आल्या. जे माझे शत्रू आहेत, त्यांना तर माझी अडचण आधीपासूनच आहे. मग असे लोक राखीला पैसे देतात आणि विरोधात बोलायला सांगतात,” असं तनुश्री म्हणाली.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanushree dutta reveals her marriage got cancelled due to rakhi sawant hrc