Tanya Mishra National Crush viral photo: मराठमोळ्या गिरिजा ओकला काही दिवसांपूर्वी नॅशनल क्रश हा टॅग मिळाला होता. आता गिरिजा ओकनंतर तान्या मिश्रा नॅशनल क्रश म्हणून नावारुपाला आली आहे.

तान्या मिश्रा बिहारची असून ती २७ वर्षांची आहे. तिने चित्रपट, वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन इव्हेंट्समधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.यापूर्वी रश्मिका मंदाना, प्रिया प्रकाश वारियर आणि तृप्ती डिमरी यांनाही ‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळाला होता. आता तान्या मिश्राबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया…

मराठमोळ्या गिरिजा ओकनंतर बिहारच्या २७ वर्षीय अभिनेत्रीने जिंकली मने

तान्या मिश्राला तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे ‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळाला आहे. काहींना तिचे डोळे आवडले आहेत, तर काही जण तिच्या स्टाईलचे कौतुक करीत आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तान्याने ‘गझनवी'( Ghaznavi ) व ‘चेस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, ‘चिडीया उड’ या वेब सीरिजमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ती लवकरच ‘सफर मोहब्बत का’ या नवीन म्युझिक व्हिडीओमध्येही दिसणार आहे.

तान्या मूळची बिहारमधील गया येथील आहे. सध्या ती मुंबईत राहते. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात ती काम करीत आहे. या क्षेत्रात काम करण्यास सुरू करण्यापूर्वी तिने मगध विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. तिने फेमिना, फिल्मफेअर व ग्राझिया यांसारख्या प्रतिष्ठित फॅशन आणि चित्रपट मासिकांसाठी फोटोशूट केले आहे. एप्रिल-मे २०२४ मध्ये ‘फेमिना’च्या मुखपृष्ठावर ती झळकली होती. त्यावेळी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तान्याने IAWA मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला होता आणि ती चौथी उपविजेती ठरली. तिने इतरही अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

दरम्यान, सिनेमा आणि वेब सीरिजबरोबरच तान्या ७ म्युझिक व्हि़डीओंमध्ये दिसली आहे.