Thamma Box Office Collection Day 20: आयुष्मान खुराना व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘थामा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. २१ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या थामाने बॉक्स ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण केले आहेत. तीन आठवड्यात इतरही चित्रपट रिलीज झाले, तरी थामा चित्रपटाने चांगले कलेक्शन केले.

थामाच्या कमाईत तिसऱ्या शनिवारी व रविवारी दमदार कमाई केली. तसेच या चित्रपटाच्या २० दिवसांच्या कलेक्शनने सलमान खानच्या ‘सिकंदर’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.

‘थामा’ने २० व्या दिवशी किती कमाई केली?

बॉलीवूडचा रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’ ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. २० दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच ‘थामा’ चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. पहिल्या आठवड्यात थामाने १०८.४ कोटींची कमाई केली.

दुसऱ्या आठवड्यात ‘थामा’ची कमाई ८२.७५% ने कमी झाली आणि १८.७ कोटींची कमाई केली. तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच १८ व्या दिवशी त्याचे एका दिवसाचे कलेक्शन पहिल्यांदाच १ कोटीच्या खाली आले आणि ८० लाखांची कमाई केली. १९ व्या दिवशी, ‘थामा’ने १.५ कोटींची कमाई केली होती.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘थामा’ने रिलीजच्या २० व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शनिवारी १.६५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘थामा’चे २० दिवसांचे एकूण कलेक्शन आता १३१.५ कोटी रुपये झाले आहे.

‘थामा’ ने सलमान खानच्या ‘सिकंदर’चा रेकॉर्ड मोडला

‘थामा’ ने रिलीजच्या २० व्या दिवशी चांगली कामगिरी केली. तिसऱ्या रविवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर सलमान खानच्या ‘सिकंदर’च्या लाइफटाइम कलेक्शन १२९.९५ कोटी रुपयांच्या कमाईलाही मागे टाकलं. ‘थामा’ हा चित्रपट आता लवकरच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. पण हा टप्पा गाठण्यासाठी त्याला अजून १९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

१४ नोव्हेंबरला ‘दे दे प्यार दे २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. त्यामुळे आणखी ४ दिवस ‘थामा’कडे कमाई करण्याची चांगली संधी आहे. अजय देवगणचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘थामा’चे शो कमी होण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत ‘थामा’ किती कमाई करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.