सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’नंतर आता ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ नावाच्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याची हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्राने एका फेसबूक पोस्टमध्ये यासंदर्भात सविस्तर लिहिलंय. तसे त्याने पंतप्रधान मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म

सनोज मिश्रा पश्चिम बंगालची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सनोजला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. यानंतर चित्रपट पाहिल्याशिवाय फक्त ट्रेलरच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली, असं सनोजने म्हटलं आहे. “आता तुरुंगात टाकून माझी हत्या केली जाऊ शकते, मला पश्चिम बंगाल पोलिसांना सोपवल्यास माझा मृत्यू निश्चित आहे,” असा दावाही सनोजने केला आहे. सनोजने फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. तसेच हा चित्रपट बनवून गुन्हा केलेला नाही, असंही तो म्हणाला आहे.

सनोज मिश्राची पोस्ट

सनोज मिश्राने लिहिलंय, “स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण तरीही निरंकुश राज्यकर्ते आणि हुकूमशहा आजही देशाला आणि देशातील नागरिकांना आपला गुलाम मानतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच मी तीस वर्षांपूर्वी घर सोडून मुंबई चित्रपटसृष्टीत आलो. माझ्या ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचा ट्रेलर न पाहता, नकळत बंगालमध्ये माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मला अटक करून तुरुंगात मारलं जाऊ शकते. मी एकच चित्रपट केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा माझ्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही. सत्य बोलल्यामुळे माझा छळ केला जात आहे.

“नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत

मी तणावाखाली नाही, पण माझे कुटुंब खूप दबावाखाली जगत आहे, कारण मी माझ्या आई-वडिलांचा एकटा मुलगा आहे. मी माझ्या मुलींचा शक्तिमान आहे, माझ्या गावातील कोणत्याही व्यक्तीची समस्यास मी तयार असतो. एका अपघातात माझ्या आईला आपला डोळा गमवावा लागला आहे. यावेळीही त्यांना मी अडचणीत असल्याचं कळालंय, तेव्हापासून ते चिंतेत आहेत. पण हा चित्रपट नसून एक चळवळ आहे आणि मला काही झालं तरी हे आंदोलन थांबू नये अशी माझी इच्छा आहे.

आम्हाला जनजागृतीच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आम्ही पृथ्वीवरील एक जिवंत माणूस आहोत आणि लोकांच्या वेदना आणि दुःखामुळे आपल्या सर्वांना फरक पडतो. सोशल मीडिया आणि फेसबुकमधून बाहेर पडून समोरासमोर येण्याची वेळ आली आहे. मला बंगाल पोलिसांच्या ताब्यात देणे म्हणजे माझा मृत्यू आहे. मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच माझ्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना ही बाब लक्षात घेऊन योग्य आणि घटनात्मक सहकार्य करण्याचे आवाहन करतो.”

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’वर वाद का?

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या ट्रेलरमध्ये बंगालमध्ये हिंदूंचा नरसंहार झाल्यानंतर तिथे सामूहिक बलात्काराच्या घटना घडू लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रेलरनुसार बंगालमधील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट असल्याने बंगालमधून हिंदूंचे स्थलांतर सुरू झाले. ट्रेलरमध्ये एक महिलाही दाखवण्यात आली होती, जिचा गेटअप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारखा आहे. यावरून गदारोळ सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The diary of west bengal director sanoj mishra scared he might be killed in jail seeks help hrc
First published on: 29-05-2023 at 14:57 IST