बॉलिवूड सोडण्याच्यामागच्या प्रियांकाच्या उत्तरावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जेव्हा शक्तिशाली लोक..’;

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच बॉलिवूड सोडण्यामागचा मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रियांकाचे समर्थन केले आहे.

Priyanka Chopra is supported by Vivek Agnahotri
प्रियांका चोप्राचे विवेक अग्नहोत्रींनी केले समर्थन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा प्रियांकाने केला आहे. अलीकडेच प्रियांकाने एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. प्रियांकाच्या या वक्तव्यावर आता ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

सध्या प्रियांका चोप्रा तिच्या आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल सीझन २’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, प्रियांकाने डॅक्स शेफर्डच्या पॉडकास्ट आर्मचेअर एक्सपर्टला मुलाखत दिली आहे. यादरम्यान प्रियांका चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून अंतर ठेवण्याबद्दल उघडपणे बोलले आहे. प्रियांकाने एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता असं प्रियांका म्हणाली.

हेही वाचा- प्रियांका, कतरिना व आलियाच्या ‘जी ले जरा’मध्ये शाहरुख खानची एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत?

प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, “मला म्युझिकने जगाच्या दुसऱ्या भागात जाण्याची संधी दिली. जे चित्रपट मला करायचे नव्हते, ते करण्याची मला आवडही नव्हती. पण, मला क्लब आणि लोकांच्या काही गटांना चांगल्या कामासाठी आकर्षित करावं लागायचं, त्यासाठी मेहनत करावी लागायची, तेव्हापर्यंत मी खूप काम केलं. पण म्युझिकची ऑफर आल्यावर मी म्हणाले की खड्ड्यात जा, मी तर अमेरिकेला निघाले.”

हेही वाचा- Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..”

प्रियांकाच्या या वक्तव्यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रियांकाच्या या वक्तव्यावर विधान केले आहे. विवेकने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे की ‘जेव्हा मोठे शक्तिशाली लोक आपली गुंडगिरी दाखवतात, तेव्हा काही लोक गुडघे टेकतात, नशा करायला लागतात, काही हार स्वीकारतात, काही शरणागती पत्करतात आणि काही मरतात. या अशक्यप्राय-पराजय गुंडांच्या टोळीच्या विरोधात, फार कमी लोक त्याग करून वेगळे स्थान निर्माण करतात. खरंच ते खऱ्या आयुष्यातले स्टार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:35 IST
Next Story
प्रियांका, कतरिना व आलियाच्या ‘जी ले जरा’मध्ये शाहरुख खानची एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत?
Exit mobile version