‘द काश्मीर फाइल्स’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे असा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. यावरून त्यांना बरेच ट्रोल केले गेले. आता हाच चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर ट्वीट करत म्हणाले, १९ जानेवारीला ‘द काश्मीर फाइल्स पुन्हा प्रदर्शित होत आहे. हा दिवस काश्मिरी पंडितांचा नरसंहार दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणूनच, चित्रपट त्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. वर्षातून दोनदा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर तुम्ही तो मोठ्या पडद्यावर चित्रपट पहिला नसेल तर तुम्ही आतच तिकिटे बुक करू शकता. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

केरळमधील हिंदू मंदिरात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला प्रवेश नाकारला; म्हणाली, “२०२३ मध्ये धार्मिक भेदभाव…”

दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती.

सध्या विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत. हा विषय करोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.