Premium

“महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी…,” ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचं भाषेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते.

adah sharmaa

सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळाली. तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच मराठी भाषेबद्दल तिने मांडलेलं मत चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते. तिथे हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडले. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. तर आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने मराठी भाषेची आवड तिला कशी निर्माण झाली हे सांगत या भाषेबद्दलचे तिचे विचार मांडले आहेत.

आणखी वाचा : “हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या…,” ‘द केरळ स्टोरी’ला प्रोपगंडा चित्रपट म्हणणाऱ्यांना अदा शर्माचे सडेतोड उत्तर

अदा म्हणाली, “मला मराठी भाषा खूप आवडते. मला मराठी कविता आवडतात आणि त्या मी अनेक वर्षांपासून म्हणत आले आहे. शाळेतही मराठी हा माझा आवडता विषय होता. मला आणि माझ्या पालकांना असं वाटतं की, जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, वाढला आहात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. प्रत्येकालाच मातृभाषेबरोबरच देशभरातल्या शक्य तितक्या इतर भाषांची प्राथमिक माहिती असायला हवी.”

हेही वाचा : शिक्षण अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात आलेली ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

दरम्यान, अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिल्याबद्दल अदाने आनंद व्यक्त करीत एका पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले होते

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kerala story fame actress adah sharma expressed her thoughts about marathi language rnv

First published on: 24-05-2023 at 11:28 IST
Next Story
Video : पापाराझींनी फोटोसाठी थांबवल्यावर अनुष्का शर्माने स्पष्टच सांगितले, म्हणाली, “बच्चा साथ में…”