सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली. अदा अमराठी असली तरीही तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम वाटतं. आता तिने तिचा आवडता मराठी पदार्थ कोणता, हे सांगितलं आहे.

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते. तिचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडले. याचबरोबर तिचे अनेक मराठी मित्र मैत्रिणीही आहेत. तिला मराठी पद्धतीचं जेवणही आवडतं. त्यापैकी एक मराठमोळा पदार्थ तिला विशेष आवडतो. तो पदार्थ कोणता याचा खुलासा तिने आता केला आहे.

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
The movie Swatantryaveer Savarkar Actor Randeep Hooda Marathi language
‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

आणखी वाचा : “महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी…,” ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचं भाषेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

अदा शर्माने नुकतीच ‘लोकमत’ला एक मुलाखत दिली. यावेळी तिने मराठी संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल, तिच्या आवडीनिवडीबद्दल भरभरून गप्पा मारल्या. यावेळी तिला तिचा आवडता मराठी पदार्थ कोणता असं विचारण्यात आलं. या प्रश्नाचं तिने जे उत्तर दिलं त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. अदा म्हणाली, “मला वरण खूप आवडतं. पण ते तिखट नाही, थोडं कमी तिखट वरण मला खरंच खूप आवडतं.”

हेही वाचा : शिक्षण अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात आलेली ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

दरम्यान, अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिल्याबद्दल अदाने आनंद व्यक्त करीत एका पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले होते.