सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली. अदा अमराठी असली तरीही तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम वाटतं. आता तिने तिचा आवडता मराठी पदार्थ कोणता, हे सांगितलं आहे.
अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते. तिचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच आवडले. याचबरोबर तिचे अनेक मराठी मित्र मैत्रिणीही आहेत. तिला मराठी पद्धतीचं जेवणही आवडतं. त्यापैकी एक मराठमोळा पदार्थ तिला विशेष आवडतो. तो पदार्थ कोणता याचा खुलासा तिने आता केला आहे.
अदा शर्माने नुकतीच ‘लोकमत’ला एक मुलाखत दिली. यावेळी तिने मराठी संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल, तिच्या आवडीनिवडीबद्दल भरभरून गप्पा मारल्या. यावेळी तिला तिचा आवडता मराठी पदार्थ कोणता असं विचारण्यात आलं. या प्रश्नाचं तिने जे उत्तर दिलं त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. अदा म्हणाली, “मला वरण खूप आवडतं. पण ते तिखट नाही, थोडं कमी तिखट वरण मला खरंच खूप आवडतं.”
दरम्यान, अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिल्याबद्दल अदाने आनंद व्यक्त करीत एका पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले होते.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story fame adah sharma revealed her favourite maharashtrian dish rnv