Premium

“माझा बॉडीगार्ड मुस्लीम आहे”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्यांच्या धर्मातील लोक…”

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत

adah-sharma-news
अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमाबद्दल चर्चा आहे. लव्हजिहादच्या जाळ्यात अडकून दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या मुलींच्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुकही होत आहे. या चित्रपटामुळे अदा प्रसिद्धीझोतात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदा शर्माने ‘द केरला स्टोरी’च्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. नुकतंच तिने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अदाला “‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर तुझ्या मुस्लीम मित्रमैत्रिणींमध्ये काही बदल झालेला जाणवला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचं सविस्तर उत्तर देत अदा म्हणाली, “नाही. माझे बॉडीगार्ड मुस्लीम आहेत. लहानपणापासून तुझा हा मित्र ख्रिश्चन, मुस्लीम, हिंदू, सीख आहे, असं कोणीही मला सांगितलं नाही. मी अशाप्रकारे मोठी झाली आहे. मी कॅथलिक शाळेत जायचे. त्यामुळे तिथे जेसस आणि मदर मेरीला आम्ही प्रार्थना करायचो.”

हेही वाचा>> Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…

“एका विशिष्ट धर्मातील लोक वाईट आहेत, असं हा चित्रपट सांगत नाही. प्रत्येक धर्मात चांगले व वाईट लोक आहेत, हे आम्ही दाखवलं आहे. अनेक चित्रपटांमध्येही वेगवेगळ्या धर्माचे व्हिलन आपण पाहिले आहेत. माझ्या सगळ्या मित्रांनी फर्स्ट डे फर्स्ट शो चित्रपट पाहिला आहे. आम्ही चित्रपटात दहशतवादावर भाष्य केलं आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या धर्मातील लोक धर्माचा गैरवापर करुन मुलींना फसवूण दहशतवादी बनवत आहेत. सीरिया आणि इतर देशात त्यांना सुसाईड बॉब्मर आणि वेश्या बनवून पाठवत आहेत. अशा लोकांपैकी माझे मित्र नाहीत,” असंही पुढे अदा शर्माने सांगितलं.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट उत्तम कामगिरी करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kerala story fame adah sharma talk about his muslim friends and bodyguard kak