scorecardresearch

Premium

‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत; जाणून घ्या कधी आणि कुठे?

‘द केरला स्टोरी’चित्रपट जमवला इतक्या कोटींचा गल्ला, काय आहे नवी ऑफर

the kerala story ticket price reduced to 99rs
‘द केरला स्टोरी’चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत ( फोटो : लोकसत्ता संग्रहित )

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर २०२३ मध्ये चांगली कमाई करणारा ‘द केरला स्टोरी’ हा दुसरा चित्रपट आहे.

हेही वाचा : “वरुण सूदशी ब्रेकअप केलं, कारण…” दिव्या अग्रवालने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली “अपूर्वला भेटले अन्…”

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भात अभिनेत्री अदा शर्मा हिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अदाने लिहिले आहे, “चित्रपट रिलीज होऊन आज ५ आठवडे पूर्ण झाले आहेत. अनेक जण मला मेसेज करत असतात. आम्ही २ ते ३ वेळा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेत तिकिटाचे दर ९९ रुपये केले आहेत.” प्रेक्षकांना ६ जूनपासून हा चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे, ही ऑफर आता सर्व सिनेमागृहांमध्ये लागू झालेली आहे. या सिनेमाने भारतात २३७.६२ कोटी, तर जगभरात २९२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा : शुबमन गिलबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर करणारी ‘ती’ मुलगी कोण? नेटकरी म्हणाले, “सारा भाभी…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने ३५.४९ कोटींची कमाई केली होती. यानंतर अवघ्या ९ दिवसांमध्ये चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता आणि त्यानंतर १७ व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तर याउलट काही भागांत हा चित्रपट टॅक्स-फ्री करण्यात आला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 16:44 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×