scorecardresearch

Premium

“सृष्टि से पहले…”, ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलरमधील पौराणिक श्लोकाने वेधलं लक्ष, १९८८ तील कार्यक्रमाशी आहे कनेक्शन

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलरमध्ये ‘त्या’ श्लोकाने वेधलं लक्ष

the vaccine war trailer
'द व्हॅक्सिन वॉर'च्या ट्रेलरमध्ये 'त्या' श्लोकाने वेधलं लक्ष

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करोना काळात भारतासाठी व्हॅक्सिन तयार करणाऱ्या वैज्ञानिकांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. नुकताच ‘द व्हॅक्सिन वॉर’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधील एका हिंदी श्लोकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा श्लोक नेमका काय आहे जाणून घेऊया…

हेही वाचा : “बाबांना तो वास आवडायचा नाही, म्हणून…” स्पृहा जोशीने सांगितला गुपचूप मासे बनवण्याचा किस्सा, म्हणाली “त्यांना आक्षेप…”

Loksatta lokrang Popular actor Piyush Mishra on the stage of Loksatta Gappa
अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब!
Loksatta lokrang Documentary The art of presenting reality video medium Work Studies in Folklore and Culture
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: वास्तव मांडण्याची कला..
Wipro founder Azim Premji
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!
boxer Mary Kom draws curtain on career
Mary Kom : स्टार बॉक्सर मेरी कोमच्या निवृत्तीच्या चर्चा, मात्र तिचं म्हणणं वेगळंच, “मी अशी कुठलीही घोषणा…”

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा ट्रेलरमध्ये “सृष्टि से पहले सत् नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था” हा संस्कृत श्लोक प्रेक्षकांना ऐकायला मिळतो. १९८८ मध्ये, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भारत एक खोज’ हा कार्यक्रम दर रविवारी दूरदर्शनवर प्रसारित व्हायचा. हा कार्यक्रम भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित होता. या माध्यमातून भारताचा जवळपास ५ हजार वर्षांचा इतिहास ५३ भागांमध्ये चित्रित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं शीर्षक गीत हा “सृष्टि से पहले सत् नहीं था…” असं होतं.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

‘भारत एक खोज’ कार्यक्रमाचं “सृष्टि से पहले सत् नहीं था…” हे शीर्षकगीत ऋग्वेद ग्रंथातील नासदीय सूक्ताचं हिंदी भाषांतर आहे. आता हा श्लोक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात रिक्रिएट करून वापरण्यात आला आहे. “लवकरच न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर “सृष्टि से पहले” हे रिक्रिएट केलेलं गाणं प्रदर्शित करण्यात येईल” अशी माहिती विवेक अग्निहोत्री यांनी एनआयशी संवाद साधताना दिली आहे.

हेही वाचा : “मोठ्या बॅनरचे चित्रपट कधीच मिळाले नाहीत”, शिल्पा शेट्टीने व्यक्त केली खंत; म्हणाली, “बॉलीवूडमध्ये फक्त…”

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The vaccine war direct vivek agnihotri recreates shristhi se pehle with shlokas from rigveda sva 00

First published on: 13-09-2023 at 08:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×