अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लवकरच रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपले असून यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच एका दिग्गज अभिनेत्याची या चित्रपटात एण्ट्री होणार आहे.

हेही वाचा : “आयुष्यातील अनेक उतार-चढाव…” नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञा भावेची खास पोस्ट, म्हणाली…

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात लवकरच अभिनेते शक्ती कपूर यांची एण्ट्री होणार आहे. सिद्धार्थ कानन यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये शक्ती कपूर गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका गॅंगस्टर कुटुंबावर आधारित असून यामध्ये अभिनेते अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. बॉबी देओलच्या भूमिकेबाबत फारशी माहिती समोर आलेली नसून तो नकारात्मक भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘कबीर सिंग’नंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा बॉलीवूडमधील दुसरा चित्रपट असणार आहे. ‘कबीर सिंग’ला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. त्यामुळेच संदीप रेड्डी वांगांच्या ‘अ‍ॅनिमल’कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा : “सॉरी भाई, माझे बजेट कमी…” नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर

दरम्यान, रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल’ चित्रपटाबरोबर सनी देओलचा ‘गदर-२’ देखील रिलीज होणार आहे. तब्बल २१ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याने ‘गदर-२’साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ११ ऑगस्टला एकाच वेळी दोन बड्या स्टार्सचे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यास दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.