scorecardresearch

Premium

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये भाव खाऊन गेला ‘हा’ मराठी अभिनेता, अजय-अतुलच्या गाण्यानेही वाढवली रंगत

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘अ‍ॅनिमल’ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या ‘जवान’ व सनी देओलच्या ‘गदर २’लादेखील मागे टाकले आहे

upendra-limaye-animal
फोटो : सोशल मीडिया

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. टीका होत असली तरी बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. रणबीरच्या अभिनयाचं कौतुक सगळेच करत आहेत, परंतु बॉबी देओलच्याही छोट्या भूमिकेचं प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. याबरोबरीनेच चित्रपटातील आणखी एका मराठी कलाकाराचं कौतुकही होताना दिसत आहे.

man killed his friend who come to save during suicide and injured his brother
दोन भावांसाठी मित्र ठरला कर्दणकाळ; एकाचा गेला जीव, दुसरा गंभीर जखमी
prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
ayushmann-khurrana-viral-video
आयुष्मान खुरानाचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? जाणून घ्या
mumbai fire breaks out at penthouse of goregaon high rise
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश

आणखी वाचा : “आजच्या पिढीच्या स्त्रियांची…” रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ पाहून गीतकार स्वानंद किरकिरेंनी व्यक्त केली खंत

हा मराठी कलाकार म्हणजे ‘जोगवा’, ‘पेज ३’ अन् ‘मुळशी पॅटर्न’सारख्या चित्रपटातून आपली छाप पाडणारा उपेंद्र लिमये. उपेंद्रने रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये शस्त्रं पुरवणाऱ्या एका डीलरची भूमिका निभावली आहे. जो गन सिक्वेन्स ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे त्याच इंटरव्हलच्या आधी येणाऱ्या सीनमध्ये उपेंद्र लिमयेची एंट्री आहे. या छोट्याश्या भूमिकेत उपेंद्र भाव खाऊन गेला आहे. इतकंच नव्हे तर या सीनदरम्यान अजय-अतुल या जोडगोळीनए संगीतबद्ध केलेलं ‘डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डिजेला’ हे गाणंदेखील बॅकग्राऊंडला वापरण्यात आलं आहे.

अजय-अतुलचं गाणं आणि उपेंद्र लिमयेचं पात्र यामुळे चित्रपटात एक वेगळीच जान आल्याचं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘अ‍ॅनिमल’ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या ‘जवान’ व सनी देओलच्या ‘गदर २’लादेखील मागे टाकले आहे. रणबीरचा हा चित्रपट वडील-मुलाच्या एका विचित्र नात्यावर बेतलेला आहे. यामध्ये रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This popular marathi actor plays important role in ranbir kapoors animal avn

First published on: 04-12-2023 at 10:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×