Tiger Shroff real name and naming story : काही कलाकारांना त्यांच्या टोपण नावाने इतकी लोकप्रियता मिळते की लोकांना त्यांचं खरं नाव माहितच नसतं. बॉलीवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफच्या बाबतीतही असंच झालंय. फिटनेस, डान्सिंग आणि स्टंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली. पण त्याचं खरं नाव काय आणि तो टायगर नावाने का ओळखला जातो, हे फार कमी लोकांना माहित आहे. तर आज त्याच्या टायगर नावामागची रंजक गोष्ट जाणून घेऊयात.

टायगर श्रॉफ हा बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. टायगर एक दशकापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. बऱ्याच जणांना वाटतं की टायगर हेच त्याचं खरं नाव आहे. पण तसं नाही. टायगरचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याचं नाव जय हेमंत ठेवलं होतं, पण लहानपणीच्या त्याच्या सवयीमुळे सर्वजण त्याला टायगर म्हणू लागले आणि मग तो याच नावाने ओळखला जाऊ लागला.

टायगर श्रॉफच्या नावामागची गोष्ट

टायगर श्रॉफने स्वतः फिल्मफेअर आणि कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या टायगर नावामागचा खुलासा केला होता. त्याला लहानपणी लोकांना चावण्याची सवय होती. तो त्याच्या मित्रांना आणि जवळच्या लोकांचा चावा घेत असे. त्याच्या या सवयीमुळे त्याचे कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक त्याला गमतीत टायगर म्हणू लागले. हळूहळू सर्वजण त्याला याच नावाने हाक मारू लागले. नंतर तो या नावाने इतका लोकप्रिय झाला की त्याचं जय नव्हे तर टायगर झालं. त्याने फिल्म इंडस्ट्रीत आल्यावरही स्वतःचं नाव टायगर ठेवलं. त्यामुळे आता सर्वजण जॅकी श्रॉफच्या मुलाला टायगर श्रॉफ म्हणून ओळखतात.

टायगर श्रॉफने २०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीपासूनच त्याने स्वतःची ओळख एक ‘ॲक्शन हिरो’ म्हणून निर्माण केली आहे. अशातच त्याचे ‘टायगर’ हे अनोखे नाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणि पडद्यावरील प्रतिमेला शोभून दिसतं. टायगर त्याची फिटनेस, मार्शल आर्ट्समधील नैपुण्य आणि जबरदस्त ॲक्शनमुळे चर्चेत असतो.

बागी, अ फ्लाइंग जट, मुन्ना मायकल, बागी २, स्टुडंट ऑफ द इयर २, वॉर, बागी ३, हीरोपंती २, गणपत, बडे मियाँ छोटे मियाँ, बागी ४ हे टायगर श्रॉफचे गाजलेले चित्रपट आहेत.