scorecardresearch

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कतरिनाच्या बहुप्रतीक्षित ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर

नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्यात या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे याचा खुलासा करण्यात आला आहे.

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कतरिनाच्या बहुप्रतीक्षित ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर

एक्सेल एंटरटेनमेंटचा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कतरिना कैफ भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. कतरिनाबरोबर या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्यात या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे याचा खुलासा करण्यात आला आहे.

आणखी वाचा : “चोल राजाच्या काळात हिंदू धर्म…”, कमल हसन यांनी केले दिग्दर्शक वेत्रीमारन यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचे समर्थन!

‘फोन भूत’ चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. कतरिना, सिद्धांत, ईशान हे तिघेही वेळोवेळी या चित्रपटाबद्दल नवी माहिती शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होते. आता ‘फोन भूत’चे नवीन मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हेही लिहिले आहे. त्यानुसार ‘फोन भूत’चा ट्रेलर १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “इनकमिंग कॉल… फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.” अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनेही हे पोस्टर शेअर केले. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, “थरार सुरू होणार आहे…आता सर्व फोन वाजतील कारण ‘फोन भूत’चा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.”

हेही वाचा : कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर यांचे धमाल रियुनियन, फोटो व्हायरल

कतरिना, सिद्धांत आणि ईशान खट्टर अभिनित त्यांच्या फर्स्ट लूकसह त्यांच्या कास्टिंगबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. ‘फोन भूत’ हा चित्रपट एक मजेशीर हॉरर-कॉमेडी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे आणि यामध्ये ही तीनही कलाकार वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या