Tridev actress Sonam was given a chocolate after she refused to do a nude scene | Loksatta

सोनमने न्यूड सीन देण्यास नकार दिला अन् निर्मात्यांनी तिला…., तब्बल ३३ वर्षांनी अभिनेत्रीचा खुलासा

पहलाज निहलानीच्या ‘मिटी और सोना’चे शूटिंग सुरू असताना घडला होता प्रकार

सोनमने न्यूड सीन देण्यास नकार दिला अन् निर्मात्यांनी तिला…., तब्बल ३३ वर्षांनी अभिनेत्रीचा खुलासा
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

१९८९ मध्ये आलेल्या ‘त्रिदेव’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळविणारी अभिनेत्री सोनमने अलीकडेच तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीबद्दल खुलासा केला. ती अनेक वर्षांनी चित्रपटसृष्टीत परतण्यास इच्छुक असल्याचं म्हणाली. सोनम अंदाजे ३० वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. सोनमने लग्नानंतर करिअरवर झालेला परिणाम आणि इतर अभिनेत्रींकडून गमावलेल्या भूमिकांबद्दल सांगितले.


‘ETimes’ला दिलेल्या मुलाखतीत, सोनमने ‘विजय’ आणि ‘आखरी अदालत’ या चित्रपटांमधील तिच्या बिकिनी दृश्यांबद्दलही भाष्य केलं. सोनम केवळ १४ वर्षांची होती तेव्हा तिला ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘विजय’ चित्रपटामध्ये बिकिनी घालावी लागली होती. तो सीन करताना ती खूप अस्वस्थ होती. पण तसाच बिकिनीचा सीन आखरी अदालतमध्ये करताना ती बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती, असं तिने नमूद केलं.

१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री

सोनमला नंतर एक प्रसंग आठवला जेव्हा तिने पहलाज निहलानीच्या ‘मिटी और सोना’चे शूट थांबवले होते. कारण त्या सीनमध्ये तिने काहीच कपडे घातले नव्हते, त्यासीनमुळे ती अस्वस्थ होती. “मला वाद घालायचा नव्हता. होय, तो सीन करताना मी खूप अस्वस्थ होते, त्यानंतर माझी मावशी आणि पहलाज तिथे आले, त्यांनी मला समजावून सांगितलं आणि मला चॉकलेट दिलं, त्यानंतर मी ठीक झाले,” असं ती म्हणाली. या चित्रपटात तिने एका महाविद्यालयीन मुलीची भूमिका साकारली होती जी रात्री वेश्या म्हणून काम करायची.

“सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…

यावेळी अभिनेत्रीने एक आठवण सांगितली. तिला यश चोप्रांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. ते आठवत सोनम म्हणाली की तिने लग्न केल्यामुळे तिने वायआरएफची आयना आणि फिरोज खानचा ‘यालगार’ गमावला. “मी सर्वात कमी कालावधीत तब्बल ३० चित्रपट साइन केले होते. पण मी खूप लवकर लग्न केलं आणि त्यामुळे मला बऱ्याच चित्रपटांचं शुटिंग लवकर करावं लागलं,” असं तिने सांगितलं.

दरम्यान, सोनमने दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी लग्न केलं तेव्हा ती केवळ १७ वर्षांची होती. त्यानंतर २०१६ मध्ये हे जोडपं वेगळं झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 19:26 IST
Next Story
ठरलं! ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा