scorecardresearch

Premium

Animal फेम तृप्ती डिमरीचं विराट कोहलीविषयीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “तो मला खूप…”

विराट कोहलीने विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती. आता तृप्ती डिमरीने त्याच्याबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

What Trupti Dimri Said About Virat Kohli?
विराट कोहलीबाबत तृप्ती डिमरीने काय म्हटलं आहे? (फोटो-इंस्टाग्राम)

Animal हा रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालतो आहे. संदीप वंगा रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तृप्ती डिमरीने चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. अशात आता तिने विराट कोहलीविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. ग्लॅमरच्या दुनियेत तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे. तिच्याबाबत सोशल मीडियावरही लोक सर्च करत आहेत. अशात तिने विराटबाबत एका मुलाखतीत स्पेशल वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली तृप्ती डिमरी?

“विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेट आहे. यात माझ्या मनात काहीही शंका नाही किंवा कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही.” तुझा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न तृप्तीला विचारण्यात आला होता. त्यावर तृप्तीने हे उत्तर दिलं आहे. जे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

Shoaib Malik share about post on social media in bpl 2024
Shoaib Malik : ‘प्रत्येकाने कोणत्याही…’, मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर शोएबने सोडलं मौन, सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया
International Monetary Fund
अंतरिम अर्थसंकल्प ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जागतिक आर्थिक दृष्टिकोन, बजेटमध्ये काय असणार?
jayram ramesh
“ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पना करूच शकत नाही. कारण…”; ममतांच्या भूमिकेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
Rahul Dravid statement about the Indian batsman between India vs England Test match sport news
भारतीय फलंदाज मागे हटणार नाहीत; द्रविड

तृप्तीच्या झोया या भूमिकेचं होतंय कौतुक

Animal या सिनेमात तृप्ती डिमरीने झोया ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तृप्ती डिमरीच्या भूमिकेचं कौतुक होतं आहे. तसंच अॅनिमल सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली आहे. सोशल मीडियावर काही नेटकरी तिला बोल्ड सीनसाठी ट्रोलही करत आहेत. तर अनेकांना तो सीन आवडला आहे. तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये आलेल्या श्रीदेवीच्या मॉम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत तृप्ती डिमरीने सहा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात उत्तुंग कामगिरी केली आहे. याच विश्वचषकात त्याने सचिनचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातला पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत विराट कोहली संघात नव्हता. कसोटी मालिकेत विराट कमबॅक करणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tripti dimri on virat kohli animal movie tripti said virat kohli is my favourite cricketer scj

First published on: 09-12-2023 at 13:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×