scorecardresearch

Premium

‘नॅशनल क्रश’ अन् ‘भाभी २’ च्या टॅगबद्दल तृप्ती डिमरी म्हणाली, “मला या सगळ्या गोष्टींचा…”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने तृप्ती डिमरीला मिळवून दिली लोकप्रियता, इन्स्टाग्राम फॉलोअर्स साडेसहा लाखांवरून थेट….

Triptii Dimri talks about tag of national crush and bhabhi 2
तृप्ती डिमरीला एका चित्रपटाने बनवलं नॅशनल क्रश

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहेत. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात एका अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलं. तिच्या छोट्याशा भूमिकेचीच सध्या जोरदार चर्चा आहे. या अभिनेत्रीच्या लोकप्रियतेतही एका आठवड्यातच मोठी वाढ झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी होय.

तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झोया नावाची भूमिका केली आहे. या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिला लोकांचं खूप प्रेम मिळतंय. कोणी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणतंय तर कोणी तिला ‘भाभी २’ म्हणतंय. यावरही आता तृप्तीने प्रतिक्रिया दिली आहे. “सगळे मला भाभी २ म्हणत आहेत. मी विमानतळावर होते, तिथे चेकिंग करणाऱ्यानेही मला भाभी म्हटलं. मला या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद वाटत आहे. सगळीकडे उत्सवासारखं वातावरण आहे. लोक दोन-तीनदा चित्रपट पाहत आहेत. ते या चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात ठेवत आहेत. ही भावना खूप सुखावणारी आहे,” असं तृप्ती ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना म्हणाली.

Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
article-370-box-office-record
‘आर्टिकल ३७०’ने मोडला ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर

“तू असे सीन करायला नको होते…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट दृश्यांवर तृप्ती डिमरीच्या पालकांची प्रतिक्रिया; म्हणाली, “ते माझ्याशी…”

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तृप्तीचे फॉलोअर्स एका आठवड्यात साडेसहा लाखांवरून तब्बल २.६ मिलियन झाले आहेत. याबद्दल तृप्ती म्हणाली, “माझ्यापेक्षा माझे कुटुंब उत्साही आहे. प्रत्येक वेळी थोडे फॉलोअर्स वाढले की ते मला सांगत असतात.” दरम्यान, या चित्रपटानंतर लोक तिचे ‘बुलबुल’ व ‘कला’ हे चित्रपटही पाहत आहेत, ही खूप चांगली गोष्ट असल्याचं तृप्तीने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Triptii dimri talks about tag of national crush and bhabhi 2 after animal success hrc

First published on: 11-12-2023 at 16:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×