श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली; अभिनेत्रीचा इन्स्टाग्राम व्हिडिओ होतोय व्हायरल | tu jhoothi main makkar actress shraddha kapoor new viral instagram reel | Loksatta

श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली; अभिनेत्रीचा इन्स्टाग्राम व्हिडिओ होतोय व्हायरल

श्रद्धा याच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

shraddha kapoor
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर जवळजवळ २ वर्षांपासून चित्रपटापासून लांब आहे. २०२० मध्ये ‘बाघी ३’मध्ये श्रद्धा मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता २ वर्षांनी श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धाबरोबर रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच श्रद्धा आणि रणबीर ही जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि प्रेमाकडे बघायचा दृष्टिकोन यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. रोमॅंटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाचं ‘तेरे प्यार में’ हे फ्रेश गाणंसुद्धा नुकतंच प्रदर्शित झालं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं लोकांना चांगलंच आवडलं आहे, शिवाय यात श्रद्धा आणि रणबीरमधील केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे.

आणखी वाचा : लॉजिकवरून ट्रोल करणाऱ्यांना ‘पठाण’च्या दिग्दर्शकाचे चोख उत्तर; ‘शोले’ चित्रपटाचं उदाहरण देत म्हणाले…

सध्या रणबीर आणि श्रद्धा दोघेही या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या गाण्याचं प्रमोशन करतानाच श्रद्धाने तिच्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. एक व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओ शेअर करत तिने तिच्या चाहत्यांनासुद्धा त्यांच्या प्रेमाची कबुली देत या नव्या गाण्यावर रील शेअर करायची विनंती केली आहे.

या व्हिडिओमध्ये श्रद्धा स्वतःसाठी पाणी पुरी बनवत आहे, आणि ती पाणी पुरी खाताना श्रद्धा खूप आनंदी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून श्रद्धा पाणीपुरीच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धा मस्तपैकी पाणीपुरीवर ताव मारताना आपल्याला दिसत आहे. श्रद्धा आणि रणबीरचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 16:46 IST
Next Story
आधी म्हणाली नवऱ्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, धमकीही दिली, आता राखी सावंतचा युटर्न, म्हणते, “आदिलची बदनामी…”