Riteish - Genelia Tujhe Meri Kasam Movie : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. मराठीसह हिंदी कलाविश्वात दोघांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रात हे दोघेही लातूरचे लाडके दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. रितेश-जिनिलीयाकडे त्यांचे चाहते 'कपल गोल्स' म्हणून पाहतात. या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ज्या चित्रपटामुळे रितेश-जिनिलीया खऱ्या आयुष्यात एकत्र आले तोच चित्रपट आता २१ वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. रितेश-जिनिलीयाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर झाली. तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट रितेश-जिनिलीयासाठी खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. याचं कारण, म्हणजे हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट होता आणि याच दरम्यान त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. हेही वाचा : RHTDM : एकेकाळी ठरला फ्लॉप, आता हाऊसफुल्ल! २३ वर्षांनी प्रदर्शित झाल्यावर आर माधवनच्या चित्रपटाने कमावले तब्बल… ३ जानेवारी २००३ रोजी 'तुझे मेरी कसम' ( Tujhe Meri Kasam ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या कॉलेज लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच शिवाय या चित्रपटातील गाणीही हिट ठरली. या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट आजवर कधीच टीव्हीवर प्रसारित झालेला नाही किंवा हा सिनेमा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध नाही. रितेश व जिनिलीया देशमुख ( Tujhe Meri Kasam ) 'तुझे तेरी कसम' ( Tujhe Meri Kasam ) चित्रपटाचं चित्रीकरण रामोजी फिल्मसिटीमध्ये झालं होतं. रामोजी राव हे या चित्रपटाचे निर्माते होते. तर, के. विजय भास्कर यांनी 'तुझे तेरी कसम'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. या चित्रपटाचे डिजिटल हक्क निर्मात्यांनी कधीच विकले नाहीत. यामुळेच हा चित्रपट आजवर टीव्हीवर दाखवण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याची लाट आली आहे. त्यामुळे रितेश-जिनिलीयाचे असंख्य चाहते 'तुझे तेरी कसम' पुन्हा रिलीज करावा यासाठी आग्रही होती. अखेर २१ वर्षांची ही प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे. हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर सायली घरी परतली! कट रचणाऱ्या प्रियाला ‘असा’ शिकवणार धडा; सक्त ताकीद देत म्हणाली…; पाहा प्रोमो 'तुझे तेरी कसम' : 'या' दिवशी होणार प्रदर्शित रितेश देशमुखने 'तुझे तेरी कसम' पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. "इथूनच सगळ्याची सुरुवात झाली…'तुझे तेरी कसम' आमच्या पदार्पणाचा चित्रपट ३ जानेवारी २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता अनेक वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. जे लोक वारंवार 'तुझे तेरी कसम'बद्दल विचारणा करत होते त्यांच्यासाठी ही खास बातमी…'तुझे तेरी कसम' येत्या १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नक्की बघा!" दरम्यान, रितेश देशमुखची पोस्ट पाहताच नेटकऱ्यांसह असंख्य बॉलीवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचं कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. आता 'तुझे तेरी कसम' पुन्हा प्रदर्शित झाल्यावर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.