Tulip Joshi left Bollywood now running Business: ‘मेरे यार की शादी है’ या २००२ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी सुंदर अभिनेत्री ट्युलिप जोशी आज ११ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्याच चित्रपटात उदय चोप्रा आणि जिम्मी शेरगील यांच्यासोबत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ट्युलिपने ‘मातृभूमी’, ‘जय हो’ आणि ‘धोखा’ सारख्या चित्रपटांनंतर इंडस्ट्रीला अचानक रामराम ठोकला. पती विनोद नायर यांच्याबरोबर कंपनी सुरू करून बिझनेसवुमन बनलेली ट्युलिप आता काय करते ते जाणून घेऊयात.

ट्युलिप जोशीचा जन्म ११ सप्टेंबर १९७९ रोजी मुंबईत झाला. तिचे वडील हिंदू आणि आई ख्रिश्चन आहे. तिची आई झाबेल जोशी या आर्मेनियन वंशाच्या आहेत, तर तिचे वडील किशोर जोशी हे गुजराती हिंदू आहेत. ट्युलिपने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. नंतर केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतली.

Tulip Joshi Bollywood actress then and now picture on her birthday
अभिनेत्री ट्युलिप जोशी (फोटो- इन्स्टाग्राम)

ट्युलिप जोशीचे बॉलीवूड पदार्पण

ट्युलिप जोशी कॉलेजमध्ये असतानाच जाहिरातीत काम करू लागली होती. नंतर तिला इंडट्रीतून ऑफर्स येऊ लागल्या. तिने ‘मेरे यार की शादी है’ चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि तिला संधी मिळाली. २००२ साली आलेल्या या चित्रपटातून ट्युलिपने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात उदय चोप्रा, जिम्मी शेरगील हे कलाकार होते.

 Tulip Joshi Bollywood actress then and now picture on her birthday
अभिनेत्री ट्युलिप जोशी (फोटो- इन्स्टाग्राम)

ट्युलिप जोशीच्या पतीचे नाव काय?

‘मेरे यार की शादी है’ सिनेमातून ट्युलिपला खूप लोकप्रियता मिळाली. नंतर तिने ‘बच्चन’, ‘जय हो’, ‘दिल मांगे मोर’, ‘धोखा’ व ‘मातृभूमी’ हे चित्रपट केले. काही काळाने तिने बॉलीवूडला रामराम ठोकला. ट्युलिप जोशीने बॉलीवूड सोडून आता एका दशकाहून अधिक काळ झाला आहे. सध्या ती पती आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. ट्युलिपच्या पतीचे नाव विनोद नायर आहे. चार वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं.

 Tulip Joshi Bollywood actress then and now picture on her birthday
अभिनेत्री ट्युलिप जोशी (फोटो- इन्स्टाग्राम)

ट्युलिप जोशी बॉलीवूड सोडल्यावर बिझनेसवुमन झाली आहे. तिने २०१७ मध्ये पतीबरोबर मिळून ‘किमया कन्सलटिंग’ (Kimaya Consulting) नावाची कंपनी सुरू केली. तसेच आता तिने ज्योतिषशास्त्राचे काम सुरू केले आहे. तसेच ती लोकांना नातेसंबंध, आरोग्य आणि करिअरशी संबंधित विषयांवर सल्ला देते.