This Bollywood Movie Completed 25 years : २००१ साली एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ गाणी होती. हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनवला होता आणि त्यात मोठे स्टार्स नव्हते. सगळेच कलाकार नवखे होते. अगदी दिग्दर्शकासाठीही हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. पण तरीसुद्धा आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. अलीकडेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ज्या काळात ९० च्या दशकातील मोठ्या स्टार्सचा बॉक्स ऑफिसवर दबदबा होता, त्या वेळी नव्या कलाकारांची ही फिल्म त्यांच्यावर भारी पडली. या चित्रपटाने बजेटच्या चारपट कमाई केली. त्यातील ११ही गाणी खूप लोकप्रिय झाली. आणि सगळ्या कलाकारांनी त्यांच्या कामातून प्रेक्षकांची पसंती मिळाली.
२५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘हा’ चित्रपट
अडीच दशकांनंतरही हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नंतर याचा सीक्वलही बनवण्यात आला, पण तो पहिल्या चित्रपटाइतका यशस्वी ठरला नाही. आज २५ वर्षांहून अधिक काळ झाला असला, तरी ‘तुम बिन’ आणि त्यातील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान टिकवून आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केला होता.
अनुभव सिन्हा यांनी तुम बिन या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेलं या चित्रपटात प्रियांशु चटर्जी, संदली सिन्हा, हिमांशु मलिक, राकेश बापट, विक्रम गोखले, अमृता प्रकाश, मनोज पाहवा आणि राजेश खेरा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘तुम बिन’ या चित्रपटाची कथा शेखर मल्होत्रा (प्रियांशु) पासून सुरू होते. त्याच्या कारचा अपघात होतो आणि अमर शाह (राकेश) याचा मृत्यू होतो. अमरचं लग्न कॅनडामध्ये पिया (संदली) सोबत होणार असतं. पण अमरच्या मृत्यूनंतर पिया त्याचा बिझनेस सांभाळण्याचा प्रयत्न करते. शेखर तिला मदत करण्यासाठी कॅनडाला जातो आणि तिची माफी मागतो. या दरम्यान शेखर पियाच्या प्रेमात पडतो.
चित्रपटात होती ११ गाणी
‘तुम बिन’ या चित्रपटातील गाणी खूपच सुपरहिट झाली आहेत. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती. या चित्रपटातील सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली असून आजही अनेक जण त्या गाण्यांना पसंती देतात. यामध्ये ‘छोटी छोटी रातें’, ‘दारू विच प्यार’, ‘देखते ही देखते’, ‘कोई फरियाद’, ‘मेरी दुनिया में’, ‘प्यार हमको होने लगा’,सुरु रु’, ‘तुम्हारे सिवा’, ‘तुम बिन’, ‘जूम बुम्बुरा’ या गाण्यांचा समावेश आहे.
किती केलेली कमाई?
‘तुम बिन’ या चित्रपटाचं बजेट साधारण २ कोटी रुपये होतं. या चित्रपटाने जगभरात सुमारे ८.२८ कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच, कमी बजेट असूनही या चित्रपटाने चांगला नफा मिळवला.
