धुरंधर व धुरंधर २ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आदित्य धर लिखित व दिग्दर्शित या चित्रपट ब़ॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटापूर्वी रणवीरचे चित्रपट फ्लॉ झाले होते आणि तो कठीण काळातून जात होता.मात्र धुरंधरने त्याच्या करिअरला मोठं वळण दिलं अस म्हणता येईल. कारण फक्त भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने कोट्यावधींची कमाई करत अनेक विक्रम मोडले. परंतु, या दरम्यान अनेकांनी या चित्रपटावर टीकासुद्धा केली तर काहींनी कौतुक केलं. अशातच आता लोकप्रिय मराठी अभिनेते उदय टिकेकर यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

उदय टिकेकर मराठी रंगभूमी, मालिका व चित्रपाटंमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी व इंग्रजी नाटकांमध्येही काम केलं आहे. बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय चित्रपटांतून त्यांनी बड्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केलीये. रणवीर सिंहबरोबरही त्यांनी रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कसमध्ये काम केलं आहे. अशताच आता त्यांनी रणवीर सिंहच्या धुरंधरबद्दल आणि त्यापूर्वीच्या त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्याला सामोरं जावं लागलेल्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी धुरंधरच्या यशामुळे लोकांनी रणवीरला देवच बनवलं असं म्हटलं आहे.

अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उदय यांनी मराठी नाटकांबद्दल बोलताना मराठी रंगभूमीवर जर नाटक अपयशी ठरलं तर त्यासाठी त्यातील नायकाला दोषी ठरवलं जातं असं म्हणजे चित्रपटांच्याबाबतीतही असंच असतं असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हा एक खेळ आहे आणि चढ उतार येत राहणार असं म्हटलं आहे.

रणवीर सिंहबद्दल काय म्हणाले उदय टिकेकर

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’बद्दल बोलताना उदय टिकेकर म्हमाले, “माझी इतर काम छान होती. पण नाटकाच्या नायकाला दोशी ठरवलं जातं. नाटक चाललं नाही की त्याचं खापर त्याच्यावर फोडलं जातं. चित्रपटांबाबतही तसंच आहे ना. आता रणवीर सिंह धुरंधरनंतर वर गेलो तो देवच बनला. पण त्याच्या आधीचे त्याचे दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यातला एक आमचाच होता सर्कस. त्यामुळे हे होत असतं”.

दरम्यान, उदय टिकेकर यांनी रणवीर सिंहबरोबर ‘सर्कस’ या चित्रपटात काम केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट २०२२मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये त्याच्याबरोबर पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव यांसारखे कलाकार झळकले होते.