मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कलाकारांना कास्टिंग काऊचची समस्या सतावत आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. आतापर्यंत अनेकांनी कास्टिंग काऊचच्या त्यांना आलेल्या अनुभवावर खुलेपणाने भाष्य केलं आहे. आता अभिनेत्री उर्फी जावेद हिनेही याबाबत मौन सोडलं आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद हिने गेल्या काही वर्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या लूक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु मनोरंजनसृष्टीत पदार्पण करताना तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. त्यावेळी तिला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला होता असा धक्कादायक खुलासा तिने केला.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

आणखी वाचा : “कमी शिकलेले लोक…” ‘पठाण’ला पाठिंबा देत हनी सिंगचं मोठं वक्तव्य, ए. आर. रहमान यांच्या नावाचाही उल्लेख

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिला आलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मी घरातून पळून मुंबईला आले. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी कामाच्या शोधात होते. तेव्हा काही प्रतिष्ठित व्यक्तींमुळे मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.”

हेही वाचा : Video : उर्फी जावेद चक्क साडी नेसून पोहोचली विमानतळावर, वाऱ्यामुळे पदर सरकला अन्…

पुढे ती म्हणाली, “एका निर्मात्याने मला वेब सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन्स देण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. मी त्यांना नकार दिला तरीही ते जबरदस्ती करतच राहिले. जर मी जर बोल्ड सीन्स दिले नाहीत तर ते मला तुरुंगात टाकतील अशी धमकीही त्यांनी मला दिली. परंतु मी स्वतःला नशीबवान समजते की मी यातून सुखरूप बाहेर पडू शकले.” तिने सांगितलेला हा अनुभव ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.