Urfi Javed : उर्फी जावेद कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आज प्रत्येक व्यक्ती तिला ओळखत आहे. आजवर उर्फीने, पाहणारे अगदी थक्क होतील असे कपडे परिधान केले आहेत; यामुळे ती नेहमीच ट्रोलर्सच्या रडारवर असते. कपड्यांमुळे तिच्यावर नेहमी टीकेचा भडिमार होतो. अशात उर्फी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेहमीप्रमाणे आताही त्याचं कारण तिचे कपडेच आहेत.
उर्फीने एखादा ड्रेस परिधान केल्यावर अशा फॅशनचा ड्रेस कोण घालेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. तसेच उर्फीच्या या कपड्यांची किंमत तरी किती असेल? असा प्रश्नही तुमच्या डोक्यात कधी ना कधी फिरला असेल. अशात आता उर्फीने थेट तिचा एक ड्रेस विक्रीसाठी काढला आहे. ग्राहकांना तिने याची किंमतही सांगितली आहे.
हेही वाचा : Video : नागार्जुन, नागा चैतन्य-सोभिता धुलिपालाला देणार कोट्यवधींची भेटवस्तू, व्हिडीओ आला समोर
उर्फी जावेदने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, तिने काळ्या रंगाचा एक मोठा गाऊन परिधान केलाय. तसेच यावर फुलं आणि फुलपाखरांची डिझाइन काढण्यात आली आहे. उर्फीने तिचा हाच ड्रेस विक्रीसाठी काढला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “सर्व डिझायनर ड्रेसमधील माझ्या आवडीचा एक ड्रेस मी विकत आहे. त्याची किंमत केवळ ३,६६,९९,००० रुपये (३ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये) आहे. ज्यांना हा ड्रेस खरेदी करायचा असेल त्यांनी थेट मला मॅसेज करा.”
हेही वाचा : ८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
आता उर्फीची ही पोस्ट पाहून नेटकरी पुन्हा एकदा थक्क झाले आहेत. उर्फीने तिच्या ड्रेसची किंमत फार जास्त ठेवली आहे, त्यामुळे यावर नेटकऱ्यांनी अनेक हास्यास्पद कमेंट केल्यात. एकाने कमेंटमध्ये लिहिलं, “इएमआयवर मिळेल का? मी मोतीचूरच्या लाडूंवर व्याज देऊ शकतो.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “फक्त ५० रुपये कमी पडत आहेत, नाहीतर मी घेतलाच असता हा ड्रेस”, “मला हा ड्रेस खरेदी करायला आवडेल, पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे”, अशा कमेंट काहींनी केल्यात. एकाने तर उर्फीला या ड्रेसमध्ये आणखी रंग आहेत का? असा प्रश्नसुद्धा विचारला आहे.