Indian Movies Ban In Pakistan: पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यानचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून जायला सांगितलं. तसेच सिंधू जल करार स्थगित करण्यात आला; इतकंच नाही तर पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

फवाद खान व वाणी कपूर यांचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात रिलीज होणार होता, पण त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण पाकिस्ताननेही आतापर्यंत अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचा उल्लेख असलेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे. हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक

Uri: The Surgical Strike on OTT: २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’वर पाकिस्तानात बंदी आहे. विक्की कौशल, यामी गौतमचा हा चित्रपट भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही झी 5 वर पाहू शकता.

एक था टाइगर

Ek Tha Tiger on OTT: सलमान खान व कतरिनाचा हा चित्रपट पाकिस्तानात बॅन आहे. या चित्रपटात भारतीय एजंट व आयएसआय एजंटची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

फँटम

Phantom on OTT : सैफ अली खान व कतरिना कैफचा ‘फँटम’ चित्रपट 26/11 हल्ल्यावर आधारित आहे. यात दहशतवादी साजिद मीर, हाफिज सईद, जकी-उर-रहमान लखवी ही पात्रे दाखवण्यात आली आहेत. हा चित्रपट पाकिस्तानने बॅन केला आहे. हा चित्रपट तुम्हाला सोनी लिव्ह वर पाहता येईल.

मुल्क

Mulk on Zee 5 : ऋषी कपूर व तापसी पन्नूच्या ‘मुल्क’वर पाकिस्तानात बंदी आहे. यात एका भारतीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट युट्यूब व झी 5 वर पाहता येईल.

गदर: एक प्रेम कथा

Gadar : सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर’ सुपरहिट चित्रपट आहे. २४ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूब व झी 5 वर पाहू शकता.

बेबी

Baby : २०१५ मध्ये आलेल्या बेबी चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आहे. अक्षय कुमार, केके मेनन व तापसी पन्नूचा हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

तेरे बिन लादेन

Tere Bin Laden: Dead Or Alive – ‘तेरे बिन लादेन’ हा एक विनोदी चित्रपट आहे. यात ओसामा बिन लादेनबद्दल काहीच दाखवण्यात आलेलं नाही, तरीही पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली. हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध आहे.