Inside Shabana Azmi-Javed Akhtar’s Holi party: देशभरात नुकताच होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या सणाला होलिकादहन केले जाते. त्याबरोबरच रंगांची उधळणही केली गेली होती. आपले कुटुंब, जवळचे लोक, मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर हा सण साजरा केला जातो. सोशल मीडियामुळे विविध ठिकाणी सण-उत्सव कसे साजरे केले जातात, याची झलक पाहायला मिळते. आता अनेक मराठी-हिंदी कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी होळीची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उर्मिला मातोंडकरने कशी साजरी केली होळी?
एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, लोकप्रिय अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी एकत्र हजेरी लावली. जेव्हा ते आले, तेव्हा त्यांच्यावर रंगांची उधळण करण्यात आली. अभिनेत्रीदेखील या उत्सवात आनंदाने सहभागी झाली.
आणखी एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ते त्यांच्या मित्र-मैत्रिणी, तसेच एकमेकांना रंग लावत आहेत. तसेच, जे पापाराझी या पार्टीच्या ठिकाणी उपस्थित होते. जावेद अख्तर आनंदाने त्यांच्यावरदेखील रंग फेकत असल्याचे दिसते.
रिचा चड्ढा व अली फजल या जोडप्यानेदेखील हजेरी लावल्याचे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये शबाना आझमी ऊर्मिला मातोंडकर, शालिनी पांडे यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रादेखील या सेलिब्रेशनमध्ये हजर होत्या. तेथील उपस्थित पाहुण्यांबरोबर रंग खेळताना दिसल्याय. तसेच, मन्नारा चोप्रादेखील डान्स करताना दिसली.
लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनॉनने तिच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. आई-वडील, बहीण नूपुर सेनॉन व तिचा नवरा स्टेबिन बेन यांच्याबरोबर होळीचे फोटो शेअर करीत तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
त्याबरोबरच सोहा अली खानने तिच्या मुलीसह नेहा धुपियाच्या कुटुंबाबरोबर होळी साजरी केली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
तसेच, अभिनेता रणबीर कपूरनेदेखील चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मराठी कलाकारांनीदेखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कलाकारांचे फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहेत.
