बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. मध्यंतरी तीचं नाव क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर अजूनही उर्वशीच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टचा संबंध ऋषभ पंतशी लावत असतात. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली असल्याचे तिने एक फोटो पोस्ट करत सांगितले होते. त्यावरही ती ऋषभसाठी तिथे गेली असल्याचा नेटकऱ्यांनी अंदाज लावला. आता कालच्या भारत – पाकिस्तान सामान्यानंतर लगेचच ती मायदेशी परतली असल्याचे तिने सांगितले. पण या सगळ्यात तिच्या कॅप्शने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

उर्वशीने इन्स्टाग्रामवर तिचे विमानातील काही फोटो शेअर करत ती भारतात परत येत असल्याची माहिती दिली. हे फोटो शेअर करत उर्वशी रौतेलाने लिहिले, “निघताना माझे हृदय तुटते आहे पण ऑस्ट्रेलियातून निघण्याची वेळ आता आली आहे.”

उर्वशी रौतेलाच्या या पोस्टवरूनही नेटकऱ्यांनी तिला ऋषभच्या नावाचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिल्या. या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले, “तू परत भारतात येत आहेस कारण ऋषभ पंत सध्या खेळत नाहीये.” तर दुसऱ्याने लिहिले, “का दुःखी होतेस? आता कोणाची आठवण येत आहे?” तर आणखीन एका नेटकऱ्याने लिहिले, “तू सामान्यदरम्यान दिसली नाहीस…”

हेही वाचा : उर्वशी रौतेलाने घातली ऋषभ पंतची चेन?; व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळले

दरम्यान भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला काही वेळ एकमेकांना डेट करत होते. परंतु, नंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. आता तो त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसह रिलेशनशिपमध्ये आहे. ऋषभने उर्वशीला इन्स्टाग्रामवरून ब्लॉक केल्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. तेव्हापासून नेटकरी प्रत्येक गोष्टीत उर्वशी आणि ऋषभचा संबंध जोडत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela posted her photos saying she ia sad because she returned from australia rnv