varun dhawan bhediya release actor wants to make happy other s wives | "दुसऱ्यांच्या बायकांना खूश करायचं..." वरुण धवनचं वक्तव्य चर्चेत | Loksatta

“दुसऱ्यांच्या बायकांना खूश करायचं…” वरुण धवनचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता वरुण धवनने या चित्रपटाबाबत पत्नी नताशाची प्रतिक्रिया काय होती हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. पण यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे

varun dhawan

अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉनसह अभिषेक बॅनर्जी, सौरभ शुक्ला, दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. ‘स्त्री’ आणि ‘रूही’ नंतर दिनेश विजानचा ‘भेडिया’ हा तिसरा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिकने केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता वरुण धवनने या चित्रपटाबाबत पत्नी नताशाची प्रतिक्रिया काय होती हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. पण यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे.

इंडिया टुडेशी बोलताना वरुण धवनने सांगितलं की, त्याची पत्नी नताशाला हा चित्रपट खूप आवडला आणि ‘भेडिया’ चित्रपट सर्वात आधी नताशानेच पाहिला होता. तो म्हणाला, “माझी बायको तर हा चित्रपट पाहून खूश झाली आता मला दुसऱ्यांच्या बायकांना खूश करायचं आहे.” ‘भेडिया’ दिग्दर्शक अमर कौशल म्हणाले, “नताशाने ‘भेडिया’ पाहिल्यानंतर मला कॉल केला होता. वरुण या चित्रपटात खूपच वेगळा दिसत आहे. हा चित्रपट मला सर्वात जास्त आवडला आहे.” अमर पुढे म्हणाला, “या चित्रपटाचं मूळ आणि ज्याप्रकारे हा चित्रपट तयार करण्यात आला. या सगळ्याशी मी पूर्णपणे जोडला गेलो होतो.”

आणखी वाचा- “…अन् सानिया मिर्झाच्या आईला वाटलं मी वेडा आहे”; वरुण धवनने सांगितला ‘तो’ किस्सा

वरुण धवन या चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला, “माझ्या करिअरमध्ये माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. थ्रिलर, गडद रंगांकडे कल हे सर्व नताशाचं आहे. कारण ती जास्तीत जास्त वेळ अशाप्रकारचे चित्रपट पाहत असते.” वरुण आणि नताशा यांनी जानेवारी २०२१ यांनी अलिबागमध्ये लग्न केलं होतं. करोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं.

आणखी वाचा- Video: चाहती चक्कर येऊन कोसळल्याचे पाहताच वरुण धवनने पुढे केला मदतीचा हात, होतोय कौतुकाचा वर्षाव

दरम्यान वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो शेवटचा कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्याबरोबर ‘जुगजुग जियो’मध्ये दिसला होता. आगामी काळात तो जान्हवी कपूरबरोबर ‘बवाल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 08:00 IST
Next Story
अलिया-रणबीरच्या लेकीच्या नावाने वेधलं सिनेसृष्टीचे लक्ष, प्रियांका चोप्रासह सोनम कपूरची कमेंट चर्चेत