Varun Dhawan buys farm land: कलाकार हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या सिनेमामुळे, तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ ते शेअर करतात. अनेकदा हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. आता अभिनेता वरुण धवन त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
वरुण धवनने काही दिवसांपूर्वी शेतजमीन खरेदी केली आहे. शेतजमीन खरेदी केल्यानंतर अभिनेत्याने ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचे म्हटले. १९ ऑगस्ट वरूणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जमीन खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तसेच इंडस्ट्रीमधील मित्रांनी कमेंट्स करत त्याच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला होता.
“शेतीला सुरुवात…”
आता वरुण धवनने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो त्याच्या शेतात गेल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. एका फोटोत तो शेतात काम करत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत तो चिखलात काम करत असल्याचे दिसत आहे. आणखी एका फोटोत त्याने खांद्यावर कुदळ धरली असल्याचे दिसत आहे. एका फोटोत त्याच्या हाताला चिखल लागल्याचे दिसत आहे. तसेच, तो हसतानाही दिसत आहे.
वरुण धवनने हे फोटो शेअर करताना, “शेतीला सुरुवात(खेती शुरू)”, अशी कॅप्शन दिली आहे. वरुणच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक कलाकारांनाही त्याच्या या फोटोंवर कमेंट्स करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने वरूणच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “सर्वोत्तम आयुष्य.” त्याचा फिटनेस ट्रेनर प्रशांत सावंतनेही वरुणच्या या निर्णयाचं कौतुक करत ‘Superb’ अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केल्या.
वरुणने त्याच्या शेतातून एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो निवांतपणे चहा व बिस्किट खाण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेत खरेदी केल्याची माहिती देताना वरुण म्हणाला, “मला तुमच्याबरोबर एक बातमी शेअर करायची आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे. मी शेत घेतलं आहे. मी शेत का घेतलं, असं मला विचारू नका. या वातावरणात चहा आणि बिस्किटांचा आनंद घेणंही अविश्वसनीय आहे.”
दरम्यान, वरुण धवन काही दिवसांपूर्वी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर मृणाल ठाकूर, पूजा हेगडे आणि मौनी रॉय हे कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसले. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
