Republic Day 2025 : अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण आणि नव्या सिनेमाची घोषणा असे अपडेट्स सतत त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आता त्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ‘बॉर्डर’ सिनेमाचे गाणे मागे वाजत असल्याचे दिसत आहे. त्याने या व्हिडीओवर कॅप्शन म्हणून त्याच्या आगामी सिनेमाचे नाव दिले आहे.

वरुण धवनचा आगामी ‘बॉर्डर २’ सिनेमाची शूटिंग सुरू आहे. हा सिनेमा १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’चा सिक्वेल असणार आहे. यात वरुण धवनसह गायक दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Samay Raina Joke about Rekha in front of Amitabh Bachchan in kbc 16 fact check
Video: “आपके पास रेखा नहीं है”, समय रैनाने बिग बींची वैयक्तिक आयुष्यावरून उडवलेली खिल्ली? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या सत्य
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Shiva
Video: आशू भर मंडपात शिवाबरोबरच्या घटस्फोटाचे पेपर फाडणार तर सारंग सावलीला…; मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट, पाहा
Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?

वरुण धवनने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ‘बॉर्डर’ सिनेमाचे गाणे लागले असू शाळेतील काही मुले मुली भारताचा झेंडा घेऊन परेड करत पुढे जात आहेत. या व्हिडीओत ‘बॉर्डर’ सिनेमातील ‘के घर कब आओगे’ हे गाणे लागले असून हा व्हिडीओ काढणारी व्यक्ती गाडीतून पुढे जात आहे असा हा व्हिडीओ आहे. यावर वरुणने ‘बॉर्डर २’ असे कॅप्शन दिले आहे.

वरुण धवनने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ‘बॉर्डर’ सिनेमाचे गाणे लागले असू शाळेतील काही मुले मुली भारताचा झेंडा घेऊन परेड करत पुढे जात आहेत. (Video – Varun Dhawan Instagram)

वरुण ‘बॉर्डर २’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याने १५ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या सैनिकांबरोबर एक फोटो शेअर करत त्याने,  “या आर्मी डे ला भारताच्या खऱ्या हिरोंचा सन्मान, त्यांच्या बरोबर असल्याचा मला अभिमान आहे.” असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली होती.

‘बॉर्डर २’ चे दिग्दर्शक जेपी दत्ता यांची मुलगी आणि या सिनेमाच्या निर्मात्या निधी दत्ता यांनी या सिनेमाबद्दल आणि दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि सनी देओल यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला.  त्या म्हणाल्या, “वरुण आणि दिलजीत हे पहिल्या चित्रपटाचे मोठे चाहते आहेत आणि फ्रँचायझीचा भाग बनून एका खर्‍या नायकाची कथा सांगण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. याशिवाय आपल्याकडे सनी सर आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने पहिल्या भागात जादू केली होती, आणि मला खात्री आहे की ते यावेळीही त्यांच्या अप्रतिम अभिनयाने तीच जादू निर्माण करतील. सनी सरांवाय ‘बॉर्डर’ पूर्ण होऊच शकत नाही.”

‘बॉर्डर २’ १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ सिनेमाचा सिक्वेल आहे. ‘बॉर्डर २’  जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. वरुण धवनने याच्या रिलीज डेट बद्दल नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

Story img Loader