दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री मुमताज यांचे पाकिस्तानी कलाकारांबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मुमताज पाकिस्तानला गेल्या होत्या, तिथे काढलेले फोटो व व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. गुलाम अली, राहत फतेह अली खान, फवाद खान यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांबरोबरचे फोटो त्यांनी पोस्ट केले होते. आता मुमताज यांनी पाकिस्तानी कलाकारांवरील भारतातील बंदी हटवली पाहिजे, त्यांना इथे येऊन आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे, असं म्हटलं आहे.

‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, मुमताज यांनी पाकिस्तान दौऱ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “मला खूप प्रेम मिळालं, खूप लंच आणि डिनर आणि खूप भेटवस्तू मिळाल्या. मी भारावून गेले होते. मला माहित नव्हतं की तिथले लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात जितकं इथले लोक करतात. लोक मला रस्त्यावर जाताना ओळखायचे, कारण मी स्वतःला मेंटेन केलं आहे. मी अजूनही आधी दिसायचे तीच मुमताज दिसते. मी फार बदलले नाही. मी जिथे जाते तिथे लोक मला ओळखतात. ही ईश्वराची कृपा आहे,” असं त्या म्हणाल्या.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
when Tanvi Azmi married Baba Azmi
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
mahesh manjrekar reacts on trolling
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर

राहत फतेह अली खान आणि फवाद खान यांनी खूप चांगल्या रितीने स्वागत केलं व आदरातिथ्य केलं, असं मुमताज यांनी सांगितलं. “आम्ही भेटलो तेव्हा राहत साहेबांची प्रकृती बरी नव्हती, पण त्यांना माझ्यासाठी गाणं गाण्यास सांगितल्यावर त्यांनी गायलं. तेव्हा मला वाटलं की मी अजूनही तीच मुमताज आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”

फवाद खानने आपल्यासाठी पूर्ण रेस्टॉरंट बुक केलं होते आणि तो आपल्या मुलासह व पत्नीसह भेटायला आला होता, असंही त्या म्हणाल्या. “ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, मी पाकिस्तानात जिथे गेले तिथे लोक मला आणि माझ्या बहिणीला भेटायला आले. आम्हाला खूप प्रेम आणि भेटवस्तू मिळाल्या. एका कलाकाराला आणखी काय हवं असतं? लोकांना माझा प्रत्येक चित्रपट माहीत होता, माझी सर्व गाणी माहीत होती,” असं त्यांनी नमूद केलं.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

मुमताज म्हणाल्या, “पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊन काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. ते प्रतिभावान आहेत. मला माहित आहे की मुंबईतील आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही, पण त्यांनाही संधी मिळायला हवी.”

Live Updates